एक्स्प्लोर

Breaking News LIVE : मुंबई-लातूर, मुंबई-बिदर एक्स्प्रेस सुरु, कोल्हापूर-नागपूर व्हाया पंढरपूर एक्सप्रेस 2 जुलैपासून द्विसाप्ताहिक धावणार

Breaking News LIVE Updates, 25th June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE :  मुंबई-लातूर, मुंबई-बिदर एक्स्प्रेस सुरु, कोल्हापूर-नागपूर व्हाया पंढरपूर एक्सप्रेस 2 जुलैपासून द्विसाप्ताहिक धावणार

Background

राज्यात गुरुवारी 9,371 रुग्ण बरे होऊन घरी, 9,844 नवे रुग्ण, राज्याचा मृत्यूदर दोन टक्क्यांवर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. गुरुवारी 9,844 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 9,371 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. सरकारी आकडेवारीनुसार राज्यात काल एकूण 1,21,767 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,62,661 इतकी झाली आहे. काल 197 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.93 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4,03,60,931 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,07,431 (14.88 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,453 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,166 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

अकरावी सीईटी परीक्षेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी 

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची (Maharashtra SSC Exam Result) परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दहावी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक (optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाणार आहे. जुलै अखेर किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात घेण्यात येणारी अकरावी सीईटी परीक्षा नेमकी कशी असणार?  शालेय शिक्षण विभागानं या सीईटी संदर्भात एक शासन निर्णय जारी केला आहे. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. सीईटी परीक्षा ही दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेचे प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे असतील. परीक्षा ही ओएमआर पद्धतीने घेतली जाईल. 

पर्यटकांसाठी खुशखबर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी आजपासून खुला

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ताडोबा प्रशासनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर 15 एप्रिल 2021 पासून प्रादुर्भाव टाळण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आला होता. 4 जूनच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार पर्यटन संबंधित गतिविधी राबवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. प्रकल्पाच्या 6 प्रवेशद्वारावरुन दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली जाणार आहे. मात्र ऑनलाईन बुकिंग प्रणाली बंद असल्यामुळे थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करावे लागणार आहे. 1 जुलैपासून नियमाप्रमाणे पावसाळ्यात ताडोबा कोअर क्षेत्र 4 महिने बंद असणार आहे. ताडोबातील पर्यटन सुरु झाल्यामुळे रिसॉर्ट-हॉटेल व्यावसायिक-जिप्सी ऑपरेटर यांच्यात मोठं समाधानाचं वातावरण आहे. बफर क्षेत्रातील सफारी सुरु करण्यासाठी मात्र नियमांसह स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत.

पॅनकार्ड आणि आधार कार्ड 30 जूनच्या आधी लिंक करा; हजार रुपये दंड भरावा लागू शकतो

पॅनकार्ड आणि आधार कार्ड संबंधित महत्त्वाची बातमी आहे. पॅन कार्ड सात दिवसात म्हणजे 30 जूनपर्यंत आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. आयकर कायदा 1961 कलम 234H मुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. हे वित्त विधेयक सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर केलेले मंजूर केले. जर आपण शासनाने दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केले नाही तर यासाठी आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.  तसेच एखाद्या व्यक्तीने शेवटच्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडला नाही तर त्याचं पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 30 जूननंतर ते पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करु शकणार नाही.

21:42 PM (IST)  •  25 Jun 2021

मुंबई-लातूर, मुंबई-बिदर एक्स्प्रेस सुरु, कोल्हापूर-नागपूर व्हाया पंढरपूर एक्सप्रेस 2 जुलैपासून द्विसाप्ताहिक धावणार

 मुंबई-लातूर, मुंबई-बिदर एक्स्प्रेस सुरु, कोल्हापूर-नागपूर व्हाया पंढरपूर एक्सप्रेस 2 जुलैपासून द्विसाप्ताहिक धावणार

13:35 PM (IST)  •  25 Jun 2021

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखण्याच्या तयारीत असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखण्याच्या तयारीत असणाऱ्या भाजपला पोलिसांनी नोटीस धाडली आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालय. याचा निषेध म्हणून हे उद्या उर्से टोल नाक्यावर रास्ता रोको केला जाणार आहे. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे. पण दुसरीकडे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी परवानगी घेतल्याचा दावा केलाय. परंतु आंदोलनाची वेळ गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे उद्या उर्से टोल नाक्यावर तणावपूर्ण वातावरण होण्याची शक्यता आहे.

11:37 AM (IST)  •  25 Jun 2021

नाशिक महानगरपालिकेची बनावट वेबसाईट, नागरिकाला 30 हजारांचा गंडा

नाशिकमध्ये एका नागरिकाने ड्रेनेज चेंबर संदर्भात ऑनलाइन तक्रार केली होती. त्याने ज्या वेबसाईटवर तक्रार केली ती मनपाची वेबसाईट बनावट असल्याचं समोर आलं आहे. सुरवातीला 20 रुपयांची तक्रार शुल्क आकारणी करण्यात आली, त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यातून दोन टप्प्यात 29 हजार  778 रुपये काढण्यात आले. 

11:08 AM (IST)  •  25 Jun 2021

तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरु, नागरिकांना खबरदारी घ्यावी: दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना बाबत बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये सध्या आहेत तेच निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील शाळा महाविद्यालय 15 जुलै पर्यत बंद राहतील. तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे, त्याची तयारी सुरू आहे. नागरिकांनीही जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांनी अनावश्यक बाहेर पडू नये. लहान मुलं तिसऱ्या लाटेत असणार आहेत, त्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डेल्टा प्लस विषाणू अधिक घातक आहे, म्युकोरमायकोसिस आणि डेल्टा प्लस बाबत नागरिकांनी काळजी घेणं गरजेच आहे असंही ते म्हणाले. 

10:35 AM (IST)  •  25 Jun 2021

हा अनुभव सर्वांनाच येतोय, अनिल देशमुखांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

सर्व एजन्सीचा वापर करायचा आणि त्रास द्यायचा हे असं होतच असत असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. आता अनिल देशमुखांकडे काही सापडत नाही, सीबीआयच्या चौकशीत काही सापडत नाही. त्यांचे आर्थिक व्यवहार तपासायचे, दहा वर्षांपूर्वीच काही काढायचं, अन एफआयआर दाखल करायचे अन छापे मारायचे काम सुरू आहे हा अनुभव सर्वांना येतोय असंही ते म्हणाले. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Horoscope Today 13 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari : गृहविभागाने सिद्दीकींना सुरक्षा न दिसल्यानेच त्यांचा जीव घेला - अमोल मिटकरीBaba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींचा गोळीबारात जीव गेला; नेते काय म्हणाले?Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू; झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावलेMaitreya Dadashree : दादाश्री मैत्रीबोध :  13 Oct 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Horoscope Today 13 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 13 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Embed widget