Breaking News LIVE : मराठा समाजाचं आंदोलन स्थगित नाही, खासदार संभाजीराजेंची माहिती
Breaking News LIVE Updates, 17 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात आज बैठक
मराठा आरक्षणप्रश्नी काल (16 जून) कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आयोजित मूक आंदोलन पार पडलं. त्यानंतर आज, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक यांची एक महत्वपूर्ण बैठक वर्षा बंगल्यावर होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असतील. मूक आंदोलन संपल्यानंतर त्या ठिकाणीच एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते सरकारच्या प्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाला प्रतिसाद देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निश्चित करण्यात आलं. त्यानुसार आज, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
'मागण्या पूर्ण करा अन्यथा परिणाम गंभीर', खासदार उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक होत असतानाच, दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं पत्रात म्हटलं आहे. "मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गंभीर होत चालला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी 'मराठा' असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र 'खराटा'च येत आहे हे वेळेवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे, असं खासदार उदयनराजेंनी पत्रात लिहिलं आहे.
राज्यात बुधवारी 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात बुधवारी (16 जून) 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 567 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 21 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 12 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 56,79,746 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.7 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 237 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,86,41,639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,34,880 (15.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यंत्रणांना सूचना
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंदर्भात टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ अशी अशी भीती व्यक्त केली.
खासदार संभाजीराजे छत्रपती दोन आठवडे आंदोलन स्थगित करणार
खासदार संभाजीराजे छत्रपती दोन आठवडे आंदोलन स्थगित करणार, सरकारने दिलेल्या आश्वासनांनातर आंदोलन स्थगित करणार
मराठा आरक्षण प्रश्नावरील बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल
मराठा आरक्षण प्रश्नावरील बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठकीला पोहोचतील. काल कोल्हापुरात मराठा समाजाचा मोर्चा निघाल्यानंतर हा प्रश्न समजून घेण्यासाठी साडेपाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होईल
पुणे, सातारा आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट
पुणे, सातारा आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र पुणे साताऱ्यातील घाट माथ्यांवर अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मुसळधार पावसाने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३० फुटांवर पोहचली आहेय जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली गेले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.