Breaking News LIVE : नाशिकमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ
Breaking News LIVE Updates, 14 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
इंग्लंडचा दणदणीत विजय, बटलरची शानदार खेळी, मॉर्गनंचा अनोखा विक्रम!
INDvsENG : भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियाला सहज नमवत पुन्हा मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतावर 8 विकेट्सने मात करत इंग्लंडने हा विजय साजरा केला. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला 157 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलरने नाबाद 83 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजाची धुलाई केली. त्याला बेअरस्टोने नाबाद 40 धावा करत चांगली साथ दिली. या विजयामुळे इंग्लंडने टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
वाढत्या कोरोना संकटामुळे सध्या प्रत्यक्ष महासभा आणि आमसभा नकोच - राज्य सरकार
मुंबई : कोरोनाच्या पुन्हा वाढत्या संसर्गामुळे राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या महासभा तसेच आमसभा प्रत्यक्ष घेणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे या महासभा आणि आमसभा ऑनलाईनच घेतल्या जातील अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. तसं प्रतिज्ञापत्रच राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत हायकोर्टात सादर करण्यात आलं. याची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही. परिस्थिती सुधारल्यानंतर योग्यवेळी प्रत्यक्ष आमसभेला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल असं मत व्यक्त करत यासंदर्भातील याचिका हायकोर्टानं निकाली काढली.
सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात; कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त
मुंबई : सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एनआयए अधिकाऱ्यांकडून या मर्सिडीज कारची कसून चौकशी सुरु आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या कारची कसून चौकशी केली असून या चौकशीत एनआयए अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली आहे. एक भली मोठी वायर असून एक ड्रेसही आहे. यामध्ये चेक्सचा शर्ट आणि ब्राउन कलरची पँट आहे. त्याचसोबत अनेक डायऱ्याही या कारमध्ये सापडल्या आहेत. एवढंच नाहीतर या कारमध्ये अनेक नंबर प्लेट्सही आढळून आल्या आहेत. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही मर्सिडीज कार याठिकाणी आणण्यात आली आणि एनआयए अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
शासनाचा महत्त्वाचा निर्णय
विनाअनुदानीत शाळा,तुकड्या व अतिरिक्त शाखांमधील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा २०% व वाढीव २०% निधी वितरणाचा आदेश आज निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयाचा लाभ ३३ हजार १५४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. सन २०२०-२१ करिता यासाठी १४०.३७ कोटी रु. एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सदर पदांवर वार्षिक आवर्ती खर्च ४२१.११ कोटी रु. इतका होणार आहे.
वाझे प्रकरणात योग्य तपास होईल; दोषींवर कारवाई होणार : हेमंत नगराळे
वाझे प्रकरणात योग्य तपास होईल; दोषींवर कारवाई होणार : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पत्रकार परिषद
मुंबई पोलीस कठीण समस्येतून जात आहे : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे
मुंबई पोलीस कठीण समस्येतून जात आहे, तुम्हा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पत्रकार परिषद
सोलापुरात महिला पोलीस काँस्टेबलची आत्महत्या
सोलापुरातील हगलूर गावाजवळ विष पिऊन आत्महत्या, उपचारापूर्वीच मृत्यू. पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने वॉट्सॲपवर मॅसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मानसिक त्रास दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याची कुटुंबीयांचा आरोप. पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांनी मानसिक त्रास दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप. या घटनेबाबत पोलीसात अद्याप कोणतीही तक्रार नोंद नाही. पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांच्यावर गुन्हा नोंद होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुरुंबियांचा नकार. तर मृत महिलेचे आणि पोलीस उपनिरीक्षकाचे चॅटिंग नवऱ्याने पाहिले होते, त्यात त्यांचे रात्री वाद झाले होते. आत्महत्या नेमकी कशामुळे घडली याची चौकशी करूनच गुन्हा नोंद करणार. पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांची फोनवरून माहिती.
सोलापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासामुळे आत्महत्या केल्या कुटुंबीयांचा आरोप
सोलापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. सोलापुरातील हगलूर गावाजवळ विष प्राशन करुन त्यांनी आयुष्य संपवलं. पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हॉट्सॲपवर मेसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मानसिक त्रास दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांनी मानसिक त्रास दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार नोंद झालेली नाही. पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. तर मृत महिलेचे आणि पोलीस उपनिरीक्षकाचे चॅटिंग नवऱ्याने पाहिले होते, त्यात त्यांचे रात्री वाद झाले होते. आत्महत्या नेमकी कशामुळे घडली याची चौकशी करुनच गुन्हा नोंद करणार, अशी माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी फोनवरुन दिली.