एक्स्प्लोर

Breaking News LIVE : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 26 हजार रुग्णांची नोंद तर 610 जणांचा मृत्यू

Breaking News LIVE Updates, 15 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 26 हजार रुग्णांची नोंद तर 610 जणांचा मृत्यू

Background

सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणावर सुनावणी, चार राज्यांनी उत्तरासाठी वेळ मागितला

सुप्रीम कोर्टात उद्या मराठा आरक्षणावर सुनावणी आहे. मागच्या सुनावणीत कोर्टाने या प्रकरणात सर्व राज्यांना नोटीस दिली होती. उद्याच्या सुनावणी आधी चार राज्यांनी उत्तरासाठी अधिकचा वेळ मागितला आहे. पंजाब, हरियाणा, तमिळनाडू, छत्तीसगड या चार राज्यांनी उत्तरासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 102 व्या घटना दुरुस्तीवर अर्थात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत याबाबत राज्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नोटिसा दिल्या गेल्या आहेत. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. या सुनीवणी दरम्यान इंद्रा सहानी खटल्यातील निकाल, मोठ्या खंडपीठाकडे सुनावणी वर्ग करायची की नाही यासंदर्भात युक्तिवाद होणार आहे.

Maharashtra Corona | राज्यात आज दिवसभरात 16 हजार 620 कोरोना बाधितांची नोंद, तर 50 रुग्णांचा मृत्यू

दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज 16 हजार 620 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 8 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 21 लाख 34 हजार 072 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 126231 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% वर पोहोचलं आहे. नागपूर जिल्ह्यातही कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. नागपुरात आज दिवसभरात 2 हजार 252 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1033 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टीम इंडियाने पराभवाचा वचपा काढला; इंग्लंडवर 7 विकेट्सने मात, विराट-इशानची विजयी खेळी

टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यासह विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.  कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या दोघांनी विजयी खेळी साकारली. कर्णधार विराट कोहलीने 46 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी साकारली. याशिवाय ईशान किशनने आपला पहिला सामना खेळत 32 बॉलमध्ये 56 धावा केल्या. 

16:16 PM (IST)  •  16 Mar 2021

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटीव्ह

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. दोन दिवसांपासून सौरभ राव यांना ताप असल्याने काल त्यांच्या कार्यालयातमधेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा रिपोर्ट आज दुपारी आला ज्यामध्ये सौरभ राव पॉझिटीव्ह आढळून आले. त्यानंतर सौरभ राव त्यांच्या कार्यालयातुन घरी गेले. कोरोनाची तीव्र लक्षणं नसल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच क्वारंटाईन होणार आहेत.

21:22 PM (IST)  •  15 Mar 2021

राज्य सरकारची रणनीति बोगस : विनायक मेटे

सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी होत आहे. मात्र, राज्य सरकारची रणनीति बोगस व अत्यंत अव्यवहारी असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला, ते पुणे जिल्ह्यातील दौंड येथे पत्रकारांशी बोलत होते. मेटे पुढे म्हणाले, "खरं तर आतापर्यंत जी वाताहत झालेले आहे आणि अंतिरिम स्थगिती आलेली आहे, ती फक्त आघाडी सरकारच्या आणि अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणाचे फळ म्हणजे ही अंतिरम स्थगिती आणि ही वेळ आलेली आहे. असा आरोप त्यानी महाविकास आघाडी सरकारवर केला. या सरकारने याचिकेकर्ते आहेत त्यांची एकत्रित बैठकसुद्धा घेतली नाही, जी बैठक झाली त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यांनी सगळं प्रकरण वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं आहे. कारण चांगलं बोलणं त्यांच्या बाबतीत काही शब्द नाहीयेत, अशी  टीका मराठा आरक्षणावरून विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण व महाविकास आघाडीवर केली.

19:38 PM (IST)  •  15 Mar 2021

कल्याण नजीक बल्यानीमध्ये नागरिकांची गर्दी, बेजबाबदर नागरिक, पालिका पोलिसांचे नियंत्रण नाही

एकीकडे कल्यान डोंबिवलीमध्ये दररोज कोरोनोचा उच्चांक गाठला जात असताना नागरिकांना मात्र कोरोनाच गांभीर्य उरलेले दिसून येत नाही. नागरिकच नव्हे तर कल्याण डोंबिवली स्टेशन बाहेर कारवाईचा फार्स निर्माण करणारे महापालिकेच पथक कल्याण नजीकच्या मोहने बल्यानी परिसरात फिरकत नसल्याने या ठिकाणी मात्र कोरोना काळात देखील बाजाराच्या नावाखाली जत्राच भरत असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी नागरिक देखील निष्काळजीपणे वावरत असून पालिकेकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्याची तसदी आजमितीला घेण्यात आलेली नाही. अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट होण्या वाचून कुणीही रोखू शकणार नाही.

19:34 PM (IST)  •  15 Mar 2021

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुकानांच्या वेळा बदलल्या, उद्यापासून दुकाने 10 ते सायंकाळी 8 पर्यंत खुली राहणार

कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच केडीएमसीने कठोर पाऊल उचलत शहरात काही निर्बंध लादले होते. यामध्ये अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकानांना सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत बंधन घालून देण्यात आले होते. त्या पाठोपाठ शहरातील रेस्टॉरंट बार आइस्क्रीम पार्लर यांना देखील सकाळी दहा ते सायंकाळी अकरा वाजेपर्यंत मर्यादा घालून देण्यात आली होती. दुकानदारांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत वेळ वाढवून देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर महापालिकेने उद्यापासून दुकानांना सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंतची मर्यादा वाढवून दिली आहे. दरम्यान हे बंधन अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणी मित्रांसाठी जीवनावश्यक वस्तू, किराणा, दूध, वृत्तपत्र वितरण यांच्यासाठी राहणार नाही.

19:31 PM (IST)  •  15 Mar 2021

उरण येथून अपहरण केलेली चिमुरडी सापडली

उरण येथून अपहरण केलेली चिमुरडी सापडली, अवघ्या सहा तासात आरोपी महिलेला अटक. आज सकाळी उरण येथून अडीच महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण करण्यात आले. पोलिओ डोस देण्याच्या बहाण्याने केले होते अपहरण. उरण, पनवेल आणि तळोजा पोलिसांना यश.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget