Breaking News LIVE : चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा ब्राऊन शुगरची कारवाई
Breaking News LIVE Updates, 14 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
१३ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर एनआयएकडून पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक, आज कोर्टात हजर करणार, अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी पहिली कारवाई
सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा, महाविकास आघाडीचा चेहरा उघड झाल्याचं म्हणत हल्लाबोल
पहाटे साडेतीनच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयाबाहेर आलेल्या इनोव्हा कारमुळे चर्चांना उधाण, अंबानींच्या घराबाहेर देखील आढळली होती पांढऱ्या रंगाची इनोव्हा
लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हा शेवटचा इशारा, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं, नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन
काल दिवसभरात राज्यात १५,६०२ कोरोनाग्रस्तांची नोंद, तर ८८ रुग्णांचा मृत्यू, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरची चिंता वाढली
श्रीलंकेत बुरख्याला बंदी, तर एक हजाराहून अधिक मदरशांना टाळं, तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह
नाशिकमध्ये आज देखिल कोरोना रुग्णसंख्येने पार केला हजारांचा टप्पा
दिवसभरात जिल्ह्यात 1356 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू. रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे- नाशिक शहर - 942, नाशिक ग्रामीण - 269, मालेगाव मनपा - 126, जिल्हा बाह्य - 19
आज दिवसभरात एकूण 523 रुग्ण बरे झाले असून, सध्या 8 हजार 48 बाधितांवर उपचार सुरु
कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच...
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज कोरोना बाधित 404 रुग्णांची नोंद. उपचार घेत असलेले रुग्ण 3040. तर एका दिवसात 249 कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी. 24 तासात कोरोना बाधित 3 रुग्णांचा मृत्यू .
रायगड जिल्ह्यात कोरोना रुगणांच्या संख्येत लक्षणीय वाढ .
आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे २३५ रुग्ण , दोन रुगणांचा मृत्यू. पनवेल तालुक्यात हद्दीत १६४ नवे रुग्ण. रायगड जिल्ह्यातील आजमितीस एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार ४७६ ....
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; आज दिवसभरात 16 हजार 620 कोरोना बाधितांची नोंद
राज्यात आज 16,620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8861 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2134072 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे.
परभणीत संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या वाढली
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने परभणीत शनिवार-रविवार संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही दिवशी जिल्ह्यामध्ये रुग्णांची वाढ झाली आहे. आज संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यामध्ये 87 रुग्ण आढळलेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात छत्तीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर सध्या एकूण 361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.