Maharashtra Headlines 18th June : महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का, नॉट रिचेबल मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार
शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. (वाचा सविस्तर)
उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावर आज शिक्कामोर्तब, ठाकरे गटाचं आज वरळीत शिबिर
शिवसेनेच्या (Shivsena) 57 व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटानं आज शिबिराचं आयोजन केलं आहे. वरळीतील NSCI इथं हे मोठं शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात नव्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. तसंच, उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांची पक्षप्रमुखपदी फेरनिवड केली जाईल. याशिवाय आदित्य ठाकरे आणि अन्य नेत्यांची नेतेपदी निवड करण्यात येणार आहे. (वाचा सविस्तर)
मराठवाड्यात पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ 10 कुटुंबांना; मार्चपासून निधीच नाही
मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी आत्महत्या प्रकरणी मोठी माहिती समोर येत असून, गेल्या पाच महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल 391 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे मार्चपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देण्यात येणारी एक लाख रुपयांची मदत मिळत नसल्याचे समोर आले आहेत.
'त्या' तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड, तरुणीच्या शरीरावरील सीमेन सँपलचे नमुने आरोपीच्या DNA शी जुळले
मरीन ड्राईव्ह हत्या (Marine Drive Hostel Murder) प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालं आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. पण आता फॉरेन्सिक अहवालात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.(वाचा सविस्तर)
पुढील पाच दिवस मुंबईसह तळकोकणात मध्यम पावसाची शक्यता, तर 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगल्या पावसाचा अंदाज
राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. राज्यातील काही भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे 22 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरुपाच्या पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे (वाचा सविस्तर)