एक्स्प्लोर

Farmer Suicide : मराठवाड्यात पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ 10 कुटुंबांना; मार्चपासून निधीच नाही

Farmer Suicide : मार्चपासून निधीच न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना छदामही मिळालेला नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

Farmer Suicide: मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी आत्महत्या प्रकरणी मोठी माहिती समोर येत असून, गेल्या पाच महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल 391 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे मार्चपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देण्यात येणारी एक लाख रुपयांची मदत मिळत नसल्याचे समोर आले आहेत. तर या मदतीसाठी प्रशासनाने सरकारकडे निधीची मागणीच केली नसल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीपासून वंचित असल्याचे समोर येत आहे. मार्चपासून निधीच न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना छदामही मिळालेला नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या गंभीर विषय बनला आहे. गेल्या 5 महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल 391 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. त्यानुसार सरासरी दररोज तीन शेतकरी आपले जीवन संपवत असल्याचे गंभीर चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. मात्र अशी परिस्थिती असताना देखील मदतीच्या बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. कारण शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देण्यात येणारी एक लाख रुपयांची मदतीसाठी दिला जाणारा निधी मार्च महिन्यापासून प्रशासनाला मिळालेलाच नाही. तर विभागीय आयुक्त कार्यालयातून प्रस्तावच पाठवला गेला नसल्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा निधी मिळालेला नाही. 

असा मिळतो निधी...

शेतकरी आत्महत्येचे स्थानिक पातळीवर सर्वेक्षण झाल्यानंतर 70 हजार रुपयांचा धनादेश कुटुंबाला सुपूर्द करण्यात येतो. तर 30 हजार रुपये वारस किंवा पत्नीच्या नावे बँकेमध्ये डिपॉझिट करण्यात येतात. मात्र मार्चपासून निधीच न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना छदामही मिळालेला नाही. जानेवारी आणि मार्चमध्ये यासाठी निधी मिळाला. मात्र त्यानंतर निधीच मिळाला नाही. 

एप्रिल, मे महिन्यांत एकालाही मदत नाही

विभागात जानेवारी महिन्यापासून आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. मार्च महिन्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर एप्रिल महिन्यात मराठवाड्यात सर्वाधिक 89 शेतकऱ्यांनी जीवन संपवले, तर मे महिन्यातही 88 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. मात्र जानेवारी महिन्यात 5, फेब्रुवारी महिन्यात 4 तर मार्च महिन्यात केवळ एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करण्यात आली.

पाच महिन्यांच्या कालावधीत दहा लाख रुपयांचे अनुदान 

गेल्या 5 महिन्यात 391 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले, मात्र यातील केवळ दहाच शेतकरी कुटुंबांना शासनाकडून मदत मिळाली आहे. चौकशीअभावी 98 प्रकरणे प्रलंबित असून, तर 236 प्रकरणे अनुदानासाठी पात्र ठरली आहे. तर 57 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत दहा लाख रुपयांचे अनुदान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना वाटप करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Water Issue: मराठवाड्यातील 93 गाव-वाड्यांना 77 टँकरद्वारे पाणीपुरवठा; आणखी मागणी वाढू शकते

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
Chhatrapati Sambhajinagar Khavdya Mountain Family News: विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत?; बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!
विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत?; बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Embed widget