एक्स्प्लोर

किरणमुळे तिघांना जीवदान, लातूरमध्ये पहिला ग्रीन कॉरिडॉर

लातूरमध्ये ब्रेन डेड झालेल्या 19 वर्षीय किरण लोभेचे अवयव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून विमानतळावर नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला.

लातूर: 17 किलोमीटरचं अंतर आणि फक्त 9 मिनिटात पार ही कोणतीही रेसिंगची स्पर्धा नव्हती. तर तिघांना जीवदान देण्यासाठीची धडपड होती. लातूरमध्ये ब्रेन डेड झालेल्या 19 वर्षीय किरण लोभेचे अवयव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून विमानतळावर नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. यावेळी लातूरकरांनीही संयमाची प्रचिती देत या जगण्याच्या संघर्षाला हातभार लावला. पोलिसांचा चोख बंदोबस्त, डॉक्टरांची तत्परता, अँब्युलन्स चालकाचा वेग आणि लातूरकरांचा संयम, यामुळे किरणचं दातृत्व फळाला आलं आणि मुंबई, हैदराबाद आणि औरंगाबादमधल्या तीन रुग्णांचे प्राण वाचले. किरणला वीजेचा शॉक लागला होता. त्यामुळे त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सोमवारी संध्याकाळपासून त्याचा मेंदू काम करणं बंद झालं. त्यानंतर कुटुंबाने अशा परिस्थितीत किरणचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. किरणमुळे तिघांना जीवदान, लातूरमध्ये पहिला ग्रीन कॉरिडॉर कुटुंबाच्या धीरोदत्तपणाच्या या निर्णयानंतर लातूरमधील डॉक्टर कामाला लागले. त्यांनी मुंबईतील डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर हालचालींना वेग आला. किरणचे हृदय, किडनी, यकृत (लिव्हर) हे अवयव गरजू रुग्णाला वेळेत देण्यासाठी लातूर विमानतळावर विमाने उभी होती. लातूर विमानतळ ते सरकारी दवाखाना हा रस्ता अवयव घेऊन जाणाऱ्या गाडीसाठी मोकळा करण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या मदतीने करण्यात आले आहे. लातूरकरांनी स्वत:हून रस्त्यातील गर्दी बाजूला करत वाहनांना विमानतळाकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. 17 किमी अंतर अवघ्या 9 मिनिटात पार करुन अॅम्ब्युलन्स विमानतळावर आली. त्यानंतर वायू वेगाने विमानांनी किरणचे अवयव घेऊन उड्डाण केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget