एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लंकेश यांचे मारेकरी सापडतात, दाभोळकर-पानसरेंचे का नाही? : हायकोर्ट

दक्षिणेतील विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कर्नाटक पोलीस महाराष्ट्रातून येऊन अटक करुन घेऊन जातात आणि महाराष्ट्रात घडणा-या गुन्ह्यांबद्दल आमच्या तपास यंत्रणांना काहीच कसं कळत नाही? याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. या शब्दांत हायकोर्टाने तपासयंत्रणेच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं आहे.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय आणि राज्य सरकार दोघांनाही गुरूवारी चांगलंच झापलं. सीबीआय आणि एसआयटीनं दाखल केलेल्या सीलबंद अहवालांवर तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने दाभोळकर प्रकरणात सीबीआयचे दिल्लीतील सहसंचालक आणि पानसरे प्रकरणात महाराष्ट्राचे गृहसचिव यांना पुढील सुनावणीवेळी कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे १२ जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. दाभोळकर-पानसरे कुटुंबियांनी तपासंत होत असलेल्या ढिलाईचा विरोध करत दाखल केलेल्या याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.या प्रकरणात वरीष्ठ सरकारी अधिका-यांना असं कोर्टात बोलनताना आपल्याला काही फार आनंद होत नाही. पण जर तपासात प्रगतीच होणार नसेल आमच्यासमोर दुसरा पर्याय काय? असा सवाल हायकोर्टाने विचारला आहे. दक्षिणेतील विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कर्नाटक पोलीस महाराष्ट्रातून येऊन अटक करुन घेऊन जातात आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल आमच्या तपास यंत्रणांना काहीच कसं कळत नाही? याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. या शब्दांत हायकोर्टाने तपासयंत्रणेच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं आहे. दरवेळेस आमच्या समोर काहीतरी तपास अहवाल सादर केले जातात पण त्यातून काही निष्पन्न होत नाही अशी नाराजीही हायकोर्टाने यावेळी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा घटना घडतात आणि त्याच्या तपासात काही निष्पन्न होत नाही हे या पुरोगामी राज्याला शोभणारं नाही असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. या अहवालांवरुन तपास करणाऱ्या यंत्रणांमध्ये आपापसांत कोणताही समन्वय नाही हे स्पष्ट होतंय असा शेराही हायकोर्टाने मारला. सीबीआय आणि एसआयटीसाठी नियमितपणे या हायकोर्टाचं कामकाज पाहणारे वकीलही आज सुनावणीस नाहीयंत यावरुनच ते गांभीर्यानं किती या प्रकाराकडे पाहतात तो दिसतं असे ताशेरे हायकोर्टाने ओढलेत. त्यामुळे गृहसचिवांनी पुढील सुनावणीला कोर्टात हजर राहावं, नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात व्यस्त आहे अशी कारणं देऊ नयेत अशी तंबाही हायकोर्टाने दिली. तसंच दिल्लीहून सीबीआयच्या सहसचिव कधी येतील असं कोर्टाने विचारल्यावर सीबीआयच्या वतीनं ४ आठवड्यांनी ते येतील असं कोर्टाला सांगण्यात आलं. त्यावर संताप व्यक्त करत दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी एक विमान पकडायला चार आठवडे कशाला लागतात असा सवाल केला. यावरुनच तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहता हे कळतं असंही कोर्टाने म्हटलं. आता या प्रकरणाची पुढील  सुनावणी १२ जुलैला ठेवण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget