एक्स्प्लोर

मोठी बातमी : ठाकरेंचे पराभूत उमेदवार अमोल किर्तीकरांच्या याचिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय, वायकरांच्या खासदारकीवर शिक्का!

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याची उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

Amol Kirtikar : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) याचिका दाखल केली होती. ही याची उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी  विजय झाला होता. तर अमोल कीर्तीकर यांना पराभव स्वीकाराला लागला होता. मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची तक्रार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उमेदवार रवींद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे अमोल किर्तीकर यांनी मतमोजणीत घोळ असल्याचा आरोप करत रवींद्र वायकर यांना अपात्र करावे अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने  सुनावणी पूर्ण केली होती. याचा निर्णय राखून ठेवला होता. या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अखेर आज न्यायालयानं अमोल किर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. 

कीर्तिकरचे आरोप कोणते? 

निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रियेत अनेक त्रुटी ठेवल्या. फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला. मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यासाठी परवानगी दिली, असंही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आपल्या एजंटला निवडणूक अधिकाऱ्याच्या टेबलाजवळ बसू दिलं नाही. कमी मतांच्या फरकाने निवडणूक हरल्यानंतर उमेदवाराला फेरमतमोजणीचा अधिकार असतानाही तो नाकारला गेला असे आरोप केलेले आहेत.त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक हरवण्यासाठी प्रयत्न केले. निवडणूक अधिकाऱ्यांनी अनेक त्रुटी ठेवल्या असंही किर्तीकरांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकरहे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल कीर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली होती. लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागला होता.

महत्वाच्या बातम्या:

रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणारJob Majha : युको बँकेत नोकरीची संधी, अटी काय?Sambhajiraje Chhatrapati : धनंजय मुंडे यांच्यात इतकं काय आहे की सरकार भूमिका घेत नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
Embed widget