Alibag : मिस्टर युनिव्हर्स आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करणार अलिबागमधील बॉडी बिल्डर्स
Alibag : मिस्टर युनिव्हर्स आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अलिबाग तालुक्यातील तीन बॉडी बिल्डर्स भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

Alibag : अलिबाग (Alibag) तालुक्यातील अनेक तरूण-तरूणी आपलं नाव सातासमुद्रपार घेऊन जात आहेत. त्यात आता अलिबाग तालुक्यातील तीन बॉडिबिल्डर्सची 15 ते 17 एप्रिल रोजी होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव' स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे अलिबागकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे येथे होणाऱ्या 15 ते 17 एप्रिल मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधत्व करण्याची संधी अलिबाग तालुक्यातील जयेंद्र मयेकर, ऋषिकेश म्हात्रे आणि दिपक राऊळ या तीन बॉडी बिल्डर्सना प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अलिबागचे नाव आंतराष्ट्रीय स्थरावर पोहचले आहे. त्यामुळे सध्या अलिबागकर आनंद व्यक्त करत आहेत. बॉ.बी.ॲण्ड फि.असो. रायगड ऑरगनायझर सेकेटरी - महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असो.जनरल सेक्रेटरी दिनेश शेळके यांनी त्यासंदर्भात लेखी पत्र पाठविले आहे.
महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र, क्रिडा परिषद महाराष्ट्र राज्य मान्यनाप्राप्त बॉडी बिल्डर्स ॲण्ड फिटनेस असोसिएशन रायगड, संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसीएशन, इंडियन बॉडी बिल्डींग ॲण्ड फिटनेस फेडरेशन तर्फे मिस्टर युनिव्हर्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागात राहणारे व घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी स्वताला सिध्द करीत जयेंद्र मयेकर यांनी चार वेळा मिस्टर इंडिया किताब पटकाविला असून एक वेळा मिस्टर आशिया हा किताबही पटकावला आहे. आजपर्यंत त्यांनी विविध प्रकारचे 22 किताब पटकाविले आहेत. मयेकर हे जिल्ह्यातील अनेक युवकांना शरीशौष्ठव स्पर्धेसाठी तयार करण्याचे काम करीत आहेत.
संबंधित बातम्या
येत्या सहा महिन्यात सुरू होणार जलवाहतूक; नवी मुंबई लवकरच मुंबई, अलिबाग, वसई-विरारला जोडली जाणार
Kirit Somaiya : 18 बंगल्यांचं वास्तव काय? कोर्लईत पाहणीसाठी सोमय्यांचा दौरा, त्यापूर्वी मुंबईत गुन्हा दाखल
Pakistan Political Crisis: पाच वर्षे पूर्ण करेन, राजीनामा देणार नाही; इम्रान खान यांनी व्यक्त केला विश्वास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























