(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपला धक्का, गटनेत्यासह सहा नगसेवक शिवसेनेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. सहा नगरसेवकांमध्ये भाजपचे गटनेते यांचाही समावेश
मुंबई : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. सहा नगरसेवकांमध्ये भाजपचे गटनेते यांचाही समावेश आहे. मंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची नावे
1. पियुष महाजन (गटनेता)
2. मुकेश वानखेडे
3. संतोष कोडी
4. शबाना अब्दुल अरिफ
5. नुसरत मेहबुब खान
6. बिलकीज बी अमान उल्लाखान
एकनाथ खडसे यांनाही धक्का?
भाजसोबत हा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का मानला जात आहे. कारण मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा गड मानला जातो. शिसवेनेते गेलेले सर्व नगरसेवक भाजपचे आहेत. तर एकनाथ खडसे यांनी देखील भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र राष्ट्रवादीत जातेवेळी एकनाथ खडसे यांच्या सोबत न आलेले हे नगरसेवक आज राष्ट्रवादीत न जाता शिवसेनेत गेल्याने हा एकप्रकारे एकनाथ खडसेंंना देखील धक्का मानला जात आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत पक्षीय बलाबल
एकूण जागा - 17
भाजप - 13
शिवसेना - 3
अपक्ष - 1