एक्स्प्लोर

अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचं कारण समोर? सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट सांगितलं, 'रागाच्या...'

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या शपथविधीची चर्चा आजही रंगते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यावर थेट भाष्य केलं आहे.

Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटेच्या वेळी घेतलेल्या शपथविधीची चर्चा आजही रंगते. यावर वारंवार चर्चा होते. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देखील यावर थेट भाष्य केलं आहे. एबीपी माझाशी फोनवर बोलताना त्यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना तो निर्णय का घेतला याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्रजींनी मान्य केलं की शिवसेना ज्या पद्धतीनं आमच्याशी युती केल्यानंतर वागत होती. त्या रागाच्या भरात अजित पवारांच्या सोबत गेलो, असं मुनगंटीवार म्हणाले. 

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, लोकं कुणाला काय समजतात हे सर्वांना माहिती आहे. विश्वगौरव नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरुन जेव्हा आपण एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो. निवडणुकीचे निकाल येत असताना 24 तारखेला चार वाजता पत्रकार परिषद घेऊन आश्चर्यजनक वक्तव्य केली गेली. त्या रागाच्या भरात आम्ही अजित पवारांसोबत गेलो, तुम्हाला कोणता राग आला होता? की तुम्ही शरद पवार यांच्यासोबत गेले. मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं नव्हतं. पवारसाहेब त्यांच्या सोबत असताना आमच्याकडून फोन जाण्याचा प्रश्नच नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, आता शिवसेना-भाजप युती आहेच. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार अजूनही शिवसेनेचेच आहेत. आम्ही तर शिंदे यांना रोजच फोन करतो. भाजपची शिवसेनेची युती आहेच. त्यामुळं आमच्याकडून उद्धव ठाकरे यांना फोन जाण्याचा प्रश्नच नाही, असं ते म्हणाले. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जबरदस्ती हात वर करुन मुख्यमंत्री बनवले. भाजपने याआधी युती केलीच होती. त्यामुळं आमचा आता प्रश्नच उपस्थित होतच नाही.

काय म्हणाल्या होत्या किशोरी पेडणेकर 
दोन्ही पक्षांची युती केवळ मानपानात अडकली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. पहिला फोन कुणी करायचा यावरूनच युती खोळंबलीय असं केसरकर म्हणाले. यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोण फोन करणार याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल. आम्ही त्यांच्या निर्णयासोबत असू. मात्र भाजपकडून इतक्या फुटकळ गोष्टीवरुन महाराष्ट्र दावणीला धरु नये. राष्ट्रवादीबरोबर सकाळची शपथ घेणं तुम्हाला पटलं. ती तुटली नसती तर तुम्ही राष्ट्रवादीबरोबर राहिले होते. युती तुटल्यानंतर सत्तांतर घडलं. रात्रीचे छुप्या पद्धतीनं भेटणे या गोष्टी सर्वांनी पाहिलं आहे. मतदारांना तुम्ही येडे समजता का? असा सवाल देखील पेडणेकर यांनी भाजपला केला. शिवसेनेतील घरातील लोकं अशा पद्धतीनं बाहेर गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आशावादी आहोत, असंही पेडणेकर म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget