एक्स्प्लोर

Chandrakant Patil : थापा मारून दिवस ढकलणे बंद करा, चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना विचारले प्रश्न

Chandrakant Patil : शरद पवारांनी नंतर काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला त्यावेळी कधीही नाव न बदलणारा मूळ काँग्रेस पक्ष कोणता होता ?

Chandrakant Patil : पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही. म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद करावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना अनेक सवाल केले. 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, 'जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना थापा मारण्याचा उच्चांक केला. काँग्रेस पक्षाने कधीच नाव बदलले नाही म्हणून जयंत पाटील अभिमानाने सांगतात. त्यांनी हे सांगावे की, शरद पवार यांनी 1978 काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून येऊन जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवले तो काँग्रेस पक्ष खरा होता की, इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष खरा होता ? शरद पवार यांचा काँग्रेस एस हा मूळ काँग्रेस पक्ष होता की, काँग्रेस आय हा मूळ पक्ष होता ? शरद पवारांनी नंतर काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला त्यावेळी कधीही नाव न बदलणारा मूळ काँग्रेस पक्ष कोणता होता ? 1999 साली काँग्रेस पक्षाने शरद पवारांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याला अधिकृत काँग्रेस म्हणायचे का ? शरद पवारांनी ज्या सोनिया गांधींना विदेशी म्हणून विरोध केला आणि नंतर त्यांच्याच नेतृत्वाखालील आघाडीत मंत्री झाले. त्यांचा काँग्रेस पक्ष खरा का ? काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण नेतृत्व करता आणि इंडियन नॅशनल काँग्रेस नावाचा आणखी एक काँग्रेस पक्ष आहे. नक्की कोणत्या काँग्रेसने नाव बदलले नाही म्हणून सांगता, हे सुद्धा जयंत पाटील यांनी स्पष्ट करावे.' 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, थापा मारण्याचा उच्चांक करताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपाचा जन्म होऊन 50 वर्षेही झाली नाहीत.  भाजपाने पन्नास वर्षात तीन वेळा नाव बदलले. काय बोलतो हे त्यांनाच समजत नाही. जनसंघाची स्थापना 1951 साली म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी झाली. 1975 साली देशात आणीबाणी लागू करून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली. त्यावेळी जनसंघाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला व त्याचाच एक भाग म्हणून आपला पक्ष जनता पक्षात विलीन केला. नंतर जनसंघाचे नेते बाहेर पडल्यामुळे 1980 साली भाजपाची स्थापना झाली. आणीबाणीच्या विरोधात लढा देताना भाजपाने त्यावेळची परिस्थिती म्हणून जे निर्णय घेतले त्यामुळे पक्षाच्या नावात बदल झाला. पण आम्ही आमच्या निष्ठा बदलल्या नाहीत आणि हिंदुत्वाचा विचारही सोडला नाही. 

देशातील हिंदुत्वाला पाच हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पाईक होण्याचा भाजपाला अभिमान आहे. पुण्याच्या कार्यक्रमात मी हेच सांगितले. पण विषय समजून न घेता हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांनी काहीही टिंगल केली तरी आम्ही ही पाच हजार वर्षांची परंपरा सोडणार नाही, असा इशारा चंद्रकांत  पाटील यांनी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget