एक्स्प्लोर

नागपुरात अमित शाह आणि सरसंघचालकांची बैठक, साडे तीन तास चर्चा

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगलं यश मिळवलं. त्यानंतर अमित शाह लगेचच नागपुरात दाखल झाले.

नागपूर : ईशान्येकडील निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर नागपुरात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्ये साडे तीन तास चर्चा झाली. भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील गुलदस्त्यात आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगलं यश मिळवलं. त्यानंतर अमित शाह लगेचच नागपुरात दाखल झाले. याशिवाय या भेटीमागे आणखी एक कारण असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. तो म्हणजे, नागपुरात 9, 10 आणि 11 मार्चला संघ प्रतिनिधींची सभा होणार आहे. संघ परिवारातील सर्व प्रतिनिधी आणि संघटना या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. त्यामुळे भेटीमागचं हे एक कारण असल्याचं बोललं जात आहे. ईशान्य भारतात मोदी लाट 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी ईशान्य भारतात मोदी लाट दिसून आली. त्रिपुरात तब्बल 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या डाव्यांना धक्का देत जनतेने भाजपला बहुमत दिलं. तर नागालँडमध्येही भाजपने मुसंडी मारली. शिवाय मेघालयमध्ये सत्ताधारी काँग्रेसला जोरदार धक्का बसला. त्रिपुरा राज्यातल्या 60 पैकी 43 जागांवर भाजप विजय मिळवला, तर डाव्यांना फक्त 16 जागांवर समाधान मानावं लागलं. गेल्या निवडणुकीत 10 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा त्रिपुरात खातंही उघडता आलं नाही. मेघालयात मात्र काँग्रेसने चांगली कामगिरी करत 60 पैकी 21 ठिकाणी विजय मिळवला. माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे चिरंजीव कोरनाड संगमा यांच्या एनपीपी अर्थात नॅशनल पीपल्स पार्टीने या ठिकाणी 19 जागांवर विजय मिळवला. भाजपचे 2 तर इतरांचे 11 उमेदवार निवडून आले. मेघालयमध्येही भाजप समर्थित सरकार स्थापन केलं जाणार आहे. नागालँडमध्ये भाजपने 60 पैकी 27, एनपीएफनेही 27 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे नागालँडमध्येही एनडीएचं सरकार असणार आहे. ईशान्येकडील सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये अगोदरपासूनच एनडीएची सत्ता आहे. आणखी तीन राज्यांचा यामध्ये समावेश झाला आहे. ईशान्येकडील केवळ मिझोराम आता काँग्रेसकडे उरलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget