एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भाजपच्या खासदाराचा शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 

BJP MP Gopal Shetty : माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण गोपाळ शेट्टी यांनी दिलेय. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडलेय.

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील ( North Mumbai Lok Sabha Constituency) भाजपचे (BJP) खासदार गोपाळ शेट्टी (BJP MP Gopal Shetty) यांनी आपल्याच शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय. यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीत सुवर्णपदक पटकावल्यानंतर तिला देण्यात आलेल्या एक कोटी रूपयांवरून खासदार शेट्टी यांनी प्रश्न उपस्थित करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांच्या मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर तिला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावरुन शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधलाय. "एखाद्या कबड्डीपटूची ओळख मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी नाही तर त्याला काहीही देऊ नये, ही कोणती व्यवस्था आहे? असा सवाल खासदार गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित करून शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय.  

BJP MP Gopal Shetty : काय म्हटले आहे गोपाळ शेट्टी यांनी?

"महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो त्यावेळीपासून प्रयत्नशील असायचो. ज्या तिघांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेत त्यांनी घर मागितलं तर सरकार देत नाही. परंतु, कबड्डीपटूंमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीला सुवर्णपदक मिळालं तर तिला एक कोटी रूपये देण्यात आले. ही कोणती पद्धत आहे? कोणा मुलाची ओळख मंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशी असेल तरच त्यांना पारितोषिक मिळणार का? तुम्ही एक गाईडलाईन बनवा, ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेत, त्यांना पूर्वीच्या काळी फ्लॅट दिले गेलेत. तेव्हा जर तीनशे फुटांचं घर होतं तर आता व्यवस्था मोठी झाली आहे. सरकार विस्तारलंय, त्यामुळं आता 500 फुटांची जागा द्या, काय फरक पडतो? असे  खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.  

गोपाळ शेट्टी यांचा खुलासा-

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे गोपाळ शेट्टी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं. मी चूकून काँग्रेसवर हल्ला केला नाही. तर मला ज्या पक्षानं वाढवलं, त्यांच्याबद्दल कशाला बोलेन, असं गोपाळ शेट्टी म्हणाले. 

पाहा काय म्हणाले गोपाळ शेट्टी

महत्वाच्या बातम्या

SRK Helps Anjali Singh Family : शाहरुखचा दिलदारपणा! दिल्ली अपघातातील मृत अंजलीच्या कुटुंबाला मदतीचा हात   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 PmMahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
Embed widget