मनोज जरांगेंच्या पोटातलं ओठावर आलं, राजकारण करायचं असेल तर पक्ष काढा, राजेंद्र राऊतांचे प्रत्युत्तर
Rajendra Raut on Manoj Jarange : राजकारण करायचे असेल तर त्यांनी पक्ष काढावा. काल त्यांच्या पोटातलं ओठावर आलं. असे म्हणत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी
Rajendra Raut on Manoj Jarange : राजकारण करायचे असेल तर त्यांनी पक्ष काढावा. काल त्यांच्या पोटातलं ओठावर आलं. त्यांनी बार्शी (Barshi) तालुक्यातील कोणाचे नाव घेतलं हे सर्वांसमोर आले असल्याचे म्हणत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. माझ्याबद्दल बोलताना काही जणांनी व्यवस्थित बोलावं असेही राऊत म्हणाले. तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं यासंदर्भातील पत्र आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लिहलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?
मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पना राजे मासाहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार आहेत. बार्शीतील राजेंद्र राऊतांचे विरोधक माजी आमदार दिलीप सोपल बरे आहेत. मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी आहेत असे जरांगे पाटील म्हणाले होते.
बार्शी तालुक्याच्या विकासासाठी माझे अनेक नेत्यांशी चांगले संबंध
राजेंद्र राऊत हा शिवरायांचा मावळा आहे हे सर्वांनी ग्रहीत धरावं असेही ते म्हणाले. बार्शी तालुक्याच्या विकासासाठी माझे अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत. स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतही चांगले संबंध होते. तसेच नारायण राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याचे राऊत म्हणाले.
बार्शीतून अंतरवाली सराटीत 200 गाड्या गेल्या नव्हत्या, तर 50 गाड्या गेल्या होत्या
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं असे राजेंद्र राऊत म्हणाले. त्यांनी समाजाच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी विनंती करत असल्याचे राऊत म्हणाले. तसेच काल बार्शीतून अंतरवाली सराटीत 200 गाड्या गेल्या नव्हत्या. तर 50 गाड्या गेल्या होत्या. गेलेले सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते असेही जरांगे पाटील म्हणाले. आमच्या प्रतिस्पर्ध्याची ही फौज होती असेही राऊत म्हणाले.
आम्हाला सुपारीची कोणतीही गरज नाही
देवानं आम्हाला भरपूर दिलं आहे. आम्हाला सुपारीची कोणतीही गरज नाही. जनतेनं आम्हाला मोठं प्रेम दिलं आह. कष्ट करुन आम्ही मिळवलं असल्याचे राजेंद्र राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: