एक्स्प्लोर

Jaykumar Gore : कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवत कोट्यवधी रुपये लाटले, आमदार जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप, अडचणीत वाढ?

Jaykumar Gore : कोरोना काळात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मुंबई : कोरोना (Corona) काळात भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जयकुमार गोरेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सातारा जिह्यातील मायणी (ता. खटाव) येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, मायणी-खटाव येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्स सेंटर आहे. हे सेंटर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते. या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे होते. याकाळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रं वापरण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला. 

जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप 

भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटले. 200 हून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनांतून निधी मिळवण्यात आला. सरकारने मोफत कोरोना उपचारांसाठी सर्व रुग्णालय, कोरोना सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषध व इंजेक्शन पुरवली होती. मात्र गोरे व त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळले असे गंभीर आरोप करण्यात आले आहे. 

गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली याप्रकरणी जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळय़ात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली व्हावा, अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायामूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे 5 जुलैला सुनावणी होणार आहे. यामुळे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ

VIDEO : जिंकल्यावर माजू नये... त्यांच्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा; राम सातपुतेंचा शायराना अंदाज, प्रणिती शिंदेंवर जोरदार टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दरTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :03 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  03 JULY  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Shahrukh Khan :  किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
Embed widget