(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP शिष्टमंडळ-गृहसचिवांची भेट, किरीट सोमय्यांनी दिली महत्वाची माहिती, शिवसैनिकांच्या हल्ल्याची चौकशी लवकरच
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांसोबत राज्य भाजपचं शिष्टमंडळ गृहसचिंवांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्रालय गंभीर दखल घेणार असल्याचं म्हटलंय.
Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्यांवर शनिवारी रात्री शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील परिस्थितीबाबत गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली असे किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. किरीट सोमय्यांसोबत राज्य भाजपचं शिष्टमंडळ गृहसचिंवांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळात सोमय्या यांच्यासह आमदार सुनील राणे, आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह, भाजपा महापालिका नेते विनोद मिश्रा यांचा समावेश आहे.
CP संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप
किरीट सोमय्यांसोबत राज्य भाजपचं शिष्टमंडळ गृहसचिंवांच्या भेटीला गेले होते. पोलिसांच्या हजेरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे गुंड मारहाण करतात, ठाकरेंच्या गुंडानी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तसेच मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप करत पांडेंनी घटनेचे cctv फुटेज गायब केले, त्यांची खात्यांतर्गत चौकशी करा अशी मागणी केलीय. सोमय्या म्हणाले, खार रोड पोलीस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला झाला, तो ठाकरे सरकारनं स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. पोलिसांना मी हल्ला होणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आणि पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या 70-80 गुंडांच्या माझ्या गाड्यांना हवाली करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं असल्याचा हल्लाबोलही सोमय्यांनी केला होता. किरीट सोमय्याचा मनसुख हिरेन करायचा असं नियोजन संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केलं असल्याचा खळबळजनक दावाही किरीट सोमय्यांनी केला होता. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानं संजय पांडेंनी घडवून आणला. असं सोमय्या म्हणाले
राज्यात स्पेशल टीम पाठविण्याची मागणी
या प्रकरणी गृहसचिवांकडून चिंता व्यक्त करण्यात आलीय. दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्रालय गंभीर दखल घेणार असल्याचे सोमय्या म्हणाले. याबाबत गृहसचिंवांसोबत 20 मिनिटे चर्चा झाली. त्यावेळी गृहसचिवांना हल्ला प्रकरणाची 7 उदाहरणं दिली असल्याचे सोमय्या म्हणाले, याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्यात स्पेशल टीम पाठविण्याची मागणीही यावेळी गृहसचिवांकडे सोमय्यांनी केलीय. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग सुरु केला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्यांवर पोलिस स्टेशनच्या आवारात हल्ला केला जातो. या सर्वांची चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.