एक्स्प्लोर

भाजपमधील खदखद समोर येतेय का? नाथाभाऊ, पंकजाताई व्हाया राम शिंदे!

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंपासून ते आता राम शिंदे यांच्यापर्यंत नाराज नेत्यांची फौज भाजपमध्ये निर्माण झालीय. यामुळं भाजपमधील खदखद समोर येतेय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीपासून ते आता विधानपरिषद निवडणुकीत 'उपऱ्या' उमेदवारांना तिकीटं दिली जात असल्याचा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंपासून ते आता राम शिंदे यांच्यापर्यंत नाराज नेत्यांची फौज भाजपमध्ये निर्माण झालीय. यामुळं भाजपमधील खदखद समोर येतेय का? असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंपासून सुरु झालेली ही नाराजांची मालिका आता पंकजा मुंडे व्हाया माजी मंत्री राम शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. यात आता भर पडली ती चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या 'स्वत:ला समजवा' या सल्ल्याची. यावरुन खडसे यांच्यानंतर पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. मला आणि इतरांना अभ्यास जमला नाही : राम शिंदे एकनाथ खडसे यांनी एबीपी माझावर आपली नाराजी उघड बोलून दाखवल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. आता यात माजी मंत्री राम शिंदे यांचीही भर पडली आहे. राम शिंदे यांनी सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. राम शिंदे यांनी ट्वीट करत म्हटलंय की, 'विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी नेते, इच्छुक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील असं म्हटलं होतं. त्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास (त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) केला. जो अभ्यास मला आणि इतरांना जमला नाही' ... त्यांनी समजावलं तसं स्वत:ला समजवा : चंद्रकांत पाटील विधानपरिषद निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे या शर्यतीतील नेत्यांना तिकीट न देता तुलनेनं नवख्या उमेदवारांना संधी दिली. यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपवरच जोरदार निशाणा साधला. त्यानंतर काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल. जसं आपल्याला तिकिट घेण्यासाठी खडसे यांनी तिथल्या दावेदारांना (हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवाणी) समजावलं तसं स्वत:ला समजवा, असं पाटील म्हणाले होते. अनेकांनी काही अपेक्षा न करता काम केलं. तसं नाथाभाऊंना पक्षाकडून खूप काही मिळालं आहे. अनेकांची तिकीटं कापून त्यांनी घरात नेली त्यावेळी त्यांनी खंजीर खुपसला नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला होता. ... त्यावेळी खडसेंनी खंजीर खुपसला नाही का?, एकनाथ खडसेंच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर VIDEO | काय म्हणालेत चंद्रकांत पाटील वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून उपऱ्यांना संधी दिली - एकनाथ खडसे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेला तिकिट नाकारल्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला होता. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले होते की, मार्चमध्येच आमच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, तर मग ही फसवणूक केली? स्वतःकडे ज्यावेळस अधिकार येतात तेव्हा संघटनेला विश्वासात न घेता, मी पक्ष चालवतो, अशी भावना निर्माण होते. तेव्हा पक्षाची अशी वाताहत होते. आज भाजपाचं जे चित्र आहे, ते सामूहिक नाही. संघटित नाही. एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतले जात नाही. एखाद्यावेळी तर ते देखाव्यापुरते दाखवले जातात, असं खडसे म्हणाले होते. इथं बहुजन समाजाच्या नेतृत्वाचं जर खच्चीकरण करत असाल, अशी विचित्र वागणूक जर मिळत असेल, तर पक्षाच्या वरिष्ठांकडे हे मांडण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. पक्षाचा विस्तार होईल, यापेक्षा एखाद्या व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा विकास होईल, अशा स्वरूपाचं वातावरण आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे. एखाद्या कुठल्यातरी व्यक्तीची हुकुमशाही चालवून घ्यायची आणि त्यांनीच निर्णय घ्यायचे. वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे स्वतः सर्वस्वी समजायचं, हे जे भाजपत सुरू आहे. लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही, असंही खडसे म्हणाले होते. खडसे म्हणाले होते की, वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीनं उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचं वाईट वाटतं. विरोधी पक्षात एकटं असताना 123 आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून 105 आमदार आले. या प्रवृत्तीमुळे 105 आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर 105 आमदारांचे 50 आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असा घणाघाती आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. EXCLUSIVE Eknath Khadse विधानपरिषदेसाठी भाजपनं तिकीट न दिल्यानं खंजीर खुपसल्याची भावना - एकनाथ खडसे स्वतःच स्वतःला शिकवते : पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील यांच्या 'स्वत:ला समजवा' या प्रतिक्रियेनंतर माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एका चित्रासह एक पोस्ट प्रकाशित केली आहे. तिथं लिहिलंय 'स्वतःच स्वतःला शिकवते आहे, शून्यापासून सुरु केलं, चित्र चांगलं जमेल थोडे दिवसात'. चंद्रशेखर बावनकुळे मात्र नाराज नाहीत! भाजप विधान परिषद उमेदवारीवरुन पक्षातील काही ज्येष्ठ नाराज असले तरी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मात्र नाराज नाहीत. विधानसभेनंतर विधान परिषदेतही डावलल्यावर एकीकडे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे ह्यांची नाराजी उघड झाली असली तरी बावनकुळे ह्यांनी मात्र पक्षाचा निर्णय मान्य असून उमेदवारी मागितलीच नाही असं सांगितलं आहे. या सगळ्या उमेदवारी घोषणेनंतर आपण एकनाथ खडसे यांच्याशी बोललो, पण आमचं बोलणं याबाबत नव्हतं असंही ते म्हणालेत. पंकजा मुंडेंशी मात्र कुठलेच संभाषण झालं नाही असं बावनकुळे म्हणालेत. या काळात आपल्याला कुठल्याही दुसऱ्या पक्षाने संपर्क केला नाही, असंही बावनकुळे यांनी सांगितलंय.
एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget