एक्स्प्लोर

... त्यावेळी खडसेंनी खंजीर खुपसला नाही का?, एकनाथ खडसेंच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर

विधानपरिषदेसाठी भाजपनं तिकीट न दिल्यानं खंजीर खुपसल्याची भावना झाली असल्याची टीका भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या या आरोपावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावणकुळे यांना तिकिट द्यावं यासाठी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात ते फार महत्वाचे नेते आहेत.  मात्र त्यांना केंद्रातील वरिष्ठांनी तिकिट नाकारलं. खडसे यांना का नाकारलं असं त्यांना विचारण्याइतके आम्ही मोठे नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नाथाभाऊंना पक्षाकडून खूप काही मिळालं आहे. त्यांनी आजवर अनेकांना डावलून घरात तिकिटं दिली, त्यावेळी त्यांनी त्या कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? असा सवाल देखील पाटील यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत पाटील म्हणाले की, खडसे यांच्याबद्दल आपण फक्त अंदाज व्यक्त करु शकतो. खडसे यांना सात ते आठ वेळा संधी दिली. खडसे यांना पक्षाने खूप काही दिलंय. रावेरचे सीटिंग खासदार हरिभाऊ जावळे यांचं घोषित केलेलं नाव मागे घेऊन खडसे यांच्या सुनेला तिकिट दिलं. त्यांची मुलगी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची चेअरमन आहे. त्यांच्या पत्नी महानंदाच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या मुलाला देखील पक्षानं तिकिट दिलं होतं. यामुळं केंद्राने असा विचार केला असेल की किती द्यायचं यांना? आणि कितीही दिलं तरी ते जाहीरपणे बोलतातच. पक्षाची कार्यपद्धती पाळत नाहीत. त्यामुळं खडसे यांनी पक्षात एक वरिष्ठ कार्यकर्ता, एक मार्गदर्शक म्हणून काम करावं, असा विचार केला असावा. आम्ही तर त्यांना तिकिट द्यावं यासाठी प्रयत्न करत होतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर सहाव्या जागेसाठी काँग्रेसची ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट इतक्या मोठ्या नेत्याने पक्षाचे वाभाडे काढताना काय खरं आणि काय खोटं आहे, हे तरी पाहायला हवं, असं देखील पाटील म्हणाले. आम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकिटं दिली आहेत, ते उपरे नाहीत, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजप आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंड्यामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशीच कार्यपद्धती हा आमच्या अजेंड्याचा भाग आहे. घरातली भांडणं बाहेर जाऊ न देणं, दुसऱ्याला मोठं करणं फक्त घरातल्यांनाच मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही, असं देखील पाटील म्हणाले. VIDEO | काय म्हणालेत चंद्रकांत पाटील नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी भाजपला मोठं करण्यात योगदान आहेत. मात्र अनेकांनी काही अपेक्षा न करता काम केलं. तसं नाथाभाऊंना पक्षाकडून खूप काही मिळालं आहे. अनेकांची तिकीटं कापून त्यांनी घरात नेली त्यावेळी त्यांनी खंजीर खुपसला नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. जसं आपल्याला तिकिट घेण्यासाठी तुम्ही तिथल्या दावेदारांना (हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवाणी) समजावलं तसं स्वत:ला समजवा, असं देखील ते म्हणाले. खडसे आम्हाला हवेच आहेत. पक्षात काम करणं म्हणजे काहीतरी मिळायला हवंच असं नाही, असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी छाती फाडून दाखवावी का? मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेचं तिकिट मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. चार-पाच मे रोजी जेव्हा नाथाभाऊंना तिकिट मिळणार नाही याची कल्पना आली. तेव्हा आम्ही पर्यायी उमेदवार तयार ठेवायला नका का? उमेदवारीचा फॉर्म भरता आला नसता तर नाचक्की झाली असती. म्हणून अन्य उमेदवारांना मुंबईत आणलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. केंद्राला चुकीची माहिती दिली असं नाथाभाऊंच म्हणणं असेल तर तुम्ही केंद्राकडे जाऊ शकता, त्यांना जाब विचारा. आमच्याकडे पंतप्रधान मोदींपासून अमित शाहांपर्यंत सर्वांशी सहज संपर्क साधता येतो. देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस आहे. ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?, असंही ते म्हणाले. वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून उपऱ्यांना संधी दिली - एकनाथ खडसे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेला तिकिट नाकारल्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला होता. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले होते की, मार्चमध्येच आमच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, तर मग ही फसवणूक केली? स्वतःकडे ज्यावेळस अधिकार येतात तेव्हा संघटनेला विश्वासात न घेता, मी पक्ष चालवतो, अशी भावना निर्माण होते. तेव्हा पक्षाची अशी वाताहत होते. आज भाजपाचं जे चित्र आहे, ते सामूहिक नाही. संघटित नाही. एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतले जात नाही. एखाद्यावेळी तर ते देखाव्यापुरते दाखवले जातात, असं खडसे म्हणाले होते. EXCLUSIVE Eknath Khadse विधानपरिषदेसाठी भाजपनं तिकीट न दिल्यानं खंजीर खुपसल्याची भावना - एकनाथ खडसे प्रदेश कार्य समितीच्या बैठकांमध्ये दोन तीन भाषणं होतात, कुणाला बोलू दिलं जात नाही. असे अनेक विषय आहेत. हे पक्षातंर्गत विषय आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालणार आहोत. अशानं कसा पक्ष वाढेल? इथं बहुजन समाजाच्या नेतृत्वाचं जर खच्चीकरण करत असाल, अशी विचित्र वागणूक जर मिळत असेल, तर पक्षाच्या वरिष्ठांकडे हे मांडण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. पक्षाचा विस्तार होईल, यापेक्षा एखाद्या व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा विकास होईल, अशा स्वरूपाचं वातावरण आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे. एखाद्या कुठल्यातरी व्यक्तीची हुकुमशाही चालवून घ्यायची आणि त्यांनीच निर्णय घ्यायचे. वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे स्वतः सर्वस्वी समजायचं, हे जे भाजपत सुरू आहे. लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही, असंही खडसे म्हणाले होते. खडसे म्हणाले होते की, वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीनं उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचं वाईट वाटतं. विरोधी पक्षात एकटं असताना 123 आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून 105 आमदार आले. या प्रवृत्तीमुळे 105 आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर 105 आमदारांचे 50 आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असा घणाघाती आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget