सोलापूर जिल्ह्याचं राजकारण तापलं, राम सातपुतेंनी काढली रणजितसिंह मोहिते पाटलांची लाज
राम सातपुते (Ram Satpute) यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. मोहिते पाटलांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीय.
Ram Satpute on Ranjitsinh Mohite Patil : EVM च्या मुद्यावरुन सध्या राज्यातील राकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडी गावानं आंदोलन केलं होतं. मात्र, प्रशासनाच्या आदेशानंतर हे मतदान झालं नाही. आता याच मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येत आहेत. दरम्यान, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्यावर जोरदार टीका केलीय. रणजितसिंह मोहिते पाटलांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल राम सातपुते यांनी केला आहे. यामुळं सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा दिवा विझायला लागला आहे. उत्तम जानकर यांनी राजीनामा देऊन कशावर हवे त्यावर निवडणूक लढवावी, मी लढायला तयार आहे असे आव्हान राम सातपुते यांनी दिलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा असा टोलाही राम सातपुते यांनी लगावला आहे. आज जमा झालेली लोक हे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कारखान्यावरचे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दूध संघातील असल्याचा टोलाही सातपुते यांनी लगावला आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीचीही सातपुतेंनी केली होती मागणी
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उत्तमराव जानकर यांचा उघड प्रचार केला आहे. माझी पत्नी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेली तिथं ट्रॅक्टर रस्त्यात आडवे लावून यांनी रस्ता आढावल्याचे देखील सातपुते म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलं आहे, त्यामुळे तत्काळ रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी करा असे राम सातपुते म्हणाले होते. यांनी माझ्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली आहे. त्यांनी उत्तमराव जानकर यांचा उघड प्रचार केल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असल्याचे राम सातपुते म्हणाले होते.
शरद पवारांनी दिली मारकडवाडीला गावाला भेट
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावाचे नाव देशभर गाजत आहे. ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने दबाब टाकत अभिरुप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. आज याच मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. या गावात सभेत बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
फडणवीसांनी कारखान्याला 113 कोटी दिले, त्यातील निम्मे पैसे मोहिते पाटलांनी मला पाडण्यासाठी वापरले, राम सातपुतेंचा आरोप