सत्तेत बसलेल्या माणसाचे नाव घेण्यापर्यंत त्यांचे कधी कार्य नव्हते ; हर्षवर्धन पाटलांची दत्तात्रय भरणेंवर टीका
Harshvardhan Patil on Dattatray Bharane : "सत्तेत बसलेल्या कोणाचं नांव घेण्याचं कारण नाही. त्यांचं नाव घेण्यापर्यंत त्यांचं कार्य आता राहिलेले नाही, अशी टीका भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर केली.
Harshvardhan Patil on Dattatray Bharane : "सत्तेत बसलेल्या माणसाचे नाव घेण्यापर्यंत त्यांचे कधी कार्य नव्हते आणि आता पण नाही, असं म्हणत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनवरून हर्षवर्धन पाटील आक्रमक झाले. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, "सत्तेत बसलेल्या कोणाचं नांव घेण्याचं कारण नाही. त्यांचं नाव घेण्यापर्यंत त्यांचं कार्य आता राहिलेले नाही. पहिल्यापासूनच त्यांचं कार्य नव्हतं, परंतु, माणसं फसली, असा खोचक टोला हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांना लगावला.
हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी पडस्थळ भागात शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी पाटील यांच्या पुढे विजेच्या समस्या मांडल्या. यावेळी पाटील यांनी राज्यमंत्री भरणे यांचे नांव न घेता टीका केली. माढा, दौंड, माळशिरसह करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याची शेती पंपाची वीज तोडली जात नाही. बारामतीचा तर विषयच येत नाही. परंतु, फक्त इंदापूर तालुक्यातील लोकांसाठी वेगळा नियम आहे का? असा प्रश्न यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज तोडणीवरून हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रति मोटार 500 रुपये बील शेतकऱ्यांनी भरावे, असा निर्णय झाला होता. परंतु, पुन्हा एकदा महावितरण शेतकऱ्यांकडे 10 हजार रुपये बील भरण्याची मागणी करत आहे. असं होत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या