एक्स्प्लोर

Maharashtra Unlock Confusion: 'अपरिपक्वता की श्रेयवाद?', अनलॉकच्या गोंधळावरुन देवेंद्र फडणवीसांचा सरकारला खोचक टोला

Maharashtra Lockdown : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकबाबत केलेल्या घोषणा त्यानंतर राज्य सरकारनं दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी घेतलेला यू टर्न यामुळं चांगलाच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झालंय. यावर विरोधकांनी देखील टीकास्त्र सोडत आहेत. या सर्व गोंधळावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत खोचक प्रश्न विचारले आहेत.

Maharashtra Lockdown : मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अनलॉकबाबत (Maharashtra Unlock) केलेल्या घोषणा त्यानंतर राज्य सरकारनं दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी घेतलेला यू टर्न यामुळं चांगलाच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झालंय. यावर विरोधकांनी देखील टीकास्त्र सोडत आहेत. या सर्व गोंधळावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करत खोचक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी आपल्या ट्वीट करत काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक?  पत्रपरिषद की प्रेसरिलीज?  अपरिपक्वता की श्रेयवाद? असे खोचक सवाल केले आहेत. 

 

विजय वडेट्टीवार यांचा यू टर्न

राज्य सरकारने लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले असल्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली होती. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली. यामध्ये राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी यू टर्न घेतला आहे. अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही, 5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता देण्यात आली असून अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात म्हटलं आहे. 

Maharashtra Lockdown : मंत्री वडेट्टीवारांचा यू टर्न!, म्हणाले, '5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता, अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील'

काय म्हणाले विजय वडेट्टीवार

वडेट्टीवार म्हणाले की, मला फ्लाईट पकडायची होती म्हणून मुंबई मध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये निर्णय तत्वतः मान्य झाला आहे हे सांगायचे राहून गेले. महाराष्ट्रातील ( 18 जिल्हे ) उद्यापासून अनलॉक होत आहेत हे मी नव्हे तर प्रसारमाध्यमांनी सांगितलं, असं देखील ते म्हणाले.  मी त्या खात्याचा मंत्री आहे त्यामुळे बैठकीत तत्त्वतः निर्णय झाल्यानंतर ते जाहीर करण्यासाठी मला कोणाला विचारायची किंवा सूचनांची गरज नाही, असंही ते म्हणाले.  तत्त्वतः निर्णय झाल्यानंतर आता महाराष्ट्र अनलॉक होण्याची प्रक्रिया कशी राहील, त्याचे टप्पे कसे राहतील हे उद्या सकाळी नऊ वाजता स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेनंतर नागपूरला येईपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयातून आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली. मात्र काय बोलणं झालं हे मात्र वडेट्टीवार यांनी सांगण्यास नकार दिला.

Maharashtra Unlock : अनलॉकबाबत गोंधळात गोंधळ! 'राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत', मंत्री वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर सरकारचं स्पष्टीकरण

<

राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Unlock : लॉकडाऊन हटवण्यासाठी पाच टप्पे, जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, काय सुरु, काय बंद?

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असं माहिती व जनसंपर्क विभागाकडून आलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे. 

 

Maharashtra Unlock : लॉकडाऊन हटवण्यासाठी पाच टप्पे, जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, काय सुरु, काय बंद?

विजय वडेट्टीवारांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं होतं 

राज्य सरकारने लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले. 

पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे

ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ

दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार

तिसऱ्या टप्प्यातील 10 जिल्हे

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर 

चौथ्या टप्प्यातील 2 जिल्हे

पुणे, रायगड

Maharashtra Lockdown : मोठी बातमी! पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला

पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असलेल्या 18 जिल्ह्यात या गोष्टी सुरु

  • रेस्टॉरंट, मॉल्स
  • गार्डन, वॉकिंग, ट्रेक सुरू होतील
  • खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
  • चित्रपट शूटिंगला परवानगी
  • थिएटर सुरू होतील
  • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे
  • ई कॉमर्स सुरू राहिल
  • जिम, सलून सुरू राहणार
  • पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही
  • बस 100 टक्के क्षमतेने
  • आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल
  • इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील

पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असलेल्या 18 जिल्ह्यात या गोष्टी सुरु

  • रेस्टॉरंट, मॉल्स
  • गार्डन, वॉकिंग, ट्रेक सुरू होतील
  • खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
  • चित्रपट शूटिंगला परवानगी
  • थिएटर सुरू होतील
  • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे
  • ई कॉमर्स सुरू राहिल
  • जिम, सलून सुरू राहणार
  • पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही
  • बस 100 टक्के क्षमतेने
  • आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल
  • इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील

लेव्हल 1 - सर्व सुरळीत राहणार

लेव्हल 2 मधील जिल्ह्यात काय?

  • 50 टक्के क्षमता रेस्टॉरंट सुरू
  • मॉल्स, थिएटर्स 50 टक्के,लोकल ट्रेन सुरु नाही
  • सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील
  • बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण
  • ई सेवा पूर्ण
  • जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के सुरू
  • बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने
  • जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, लॉंग ट्रेन, खाजगी गाड्या,टॅक्सी यांना परवानगी आहे मात्र पाचव्या लेव्हलला जाण्यासाठी ई पास लागेल

लेव्हल 3 मधील जिल्ह्यात काय?

  • अत्यावश्यक दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत 
  • इतर दुकाने  सोमवार ते शुक्रवार 7 ते 2  ( शनिवार रविवार बंद)

मुंबई लोकलचं काय?

दुसऱ्या लेव्हलमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे. मुंबईत आता सध्या लोकल सुरु होणार नाही. हा  रेट कमी झाला तर लोकल सुरू होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

व्हिडीओ

Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Solapur Crime: कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
Pune Prashant Jagtap: प्रशांत जगतापांच्या राजीनामा अस्त्राकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक
प्रशांत जगतापांच्या राजीनामा अस्त्राकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक
Embed widget