एक्स्प्लोर

लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा प्रयत्न, चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप, त्यांच्या शिबारीत अर्ज न करण्याचं आवाहन 

महिलांनी मविआच्या शिबिरात अर्ज करु नये. कारण, मविआच्या नेत्यांकडून लाडकी बहिण योजनेत (Ladki Bahin Yojana) फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला.

Chitra Wagh on Ladki Bahin Yojana : महिलांनी महाविकास आघाडीच्या शिबिरात अर्ज करु नये. कारण, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत (Ladki Bahin Yojana) फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. महिलांचे अर्ज बाद करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे वाघ म्हणाल्या. अर्जात त्रुटी ठेवत सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा कट आहे. अॅप, सेतू केंद्र किंवा पोर्टलवर स्वत: अर्ज भरण्याचे आवाहन वाघ यांनी केलं आहे. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिबीरात महिलांनी अर्ज करु नये. कारण, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रयत्न असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. अर्जात त्रुटी ठेवत सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा कट असल्याचे वाघ म्हणाल्या.

काय आहे लाडकी बहिण योजना?

लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु, अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरु असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत.

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?

सुरुवातीला लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. मात्र, आता आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो एवढी कागदपत्रे असतील तरीदेखील तुम्ही यासाठी अर्ज करु शकता.  योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. नारीशक्ती अॅपवरही अर्ज भरता येईल. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

पैसे कधी जमा होणार?

लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.

महत्वाच्या बातम्या:

CM Ladki Bahin Scheme: ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Fire News: वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
jayant Patil : नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu Amravati : 26 तारखेपर्यंत जरांगेंची वाट बघू अन्यथा..., बच्चू कडूंचा सरकारलाही इशाराSHAHAJI BAPU ON UDHAV:ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत,ही काळ्या दगडावरचीDharavi Mosque News : मशिदीचा अवैध भाग तोडला, धारावीत ग्राऊंड झिरोवर एबीपी माझाBJP Oppose to Anna Bansode : राष्ट्रवादीचा प्रचार नाही करणार, अण्णा बनसोडेंना भाजपचा विरोध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Fire News: वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
वडगाव शेरी परिसरात सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
jayant Patil : नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Astrology : 13 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; कमावणार भरपूर पैसा, संपत्तीत होणार अफाट वाढ
13 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; कमावणार भरपूर पैसा, संपत्तीत होणार अफाट वाढ
Embed widget