Chandrakant Patil : विरोधकांना उकसवून संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे का? चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल
विरोधकांना उकसवून संजय राऊत ( Sanjay Raut) यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे काय? असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केलाय.
Chandrakant Patil On Sanjay Raut : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांना बदनाम करून उद्धव ठाकरे यांना त्यांची खुर्ची खाली करण्यास भाग पडायचे आहे," असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर केला आहे. याबरोबरच "विरोधकांना उकसवून संजय राऊत यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे की काय? असा प्रश्न उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "मागील भाजप सरकारच्या काळात 25 हजार कोटींचा महाआयटी घोटाळा झाला असल्याचा आरोप करत या घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे यांना देशाबाहेर पळवून लावले असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला होता. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अमोल काळे कोण आहे? ते मला माहीत नसून, त्याच्यावर काय आरोप आहेत हे सुद्धा मला माहीत नाही. तुमच्या गळ्याशी आल्यानंतर हे सर्व तुम्हाला आठवलं काय? भाजप नेत्यांवर आरोप केल्यानंतर मी शांत बसायचं काय? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझा आणि संजय राऊत किंवा शरद पवार यांच्या बांधाला बांध नाही. किरीट सोमय्या हे आमचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर मी बोलायचे नाही काय? गेल्या 27 महिन्यांपासून यांचे सरकार आहे. कोणी घोटाळे केले असतील तर त्याची सरकारकडे तक्रार करावी. 27 महिन्यांपासून कोणी काय घोटाळे केले? हे तुम्हाला माहीत नव्हते काय?"
"अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक आहेत. हे सर्व जण भांबावून गेले आहेत, असे म्हणत, पक्षाच्या नेत्यांना बोललेले आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
"राजकारणात टीका करताना काय-काय शब्द काढतात? धमक्या काय देतात. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. परंतु, त्यांच्या प्रकरणातून सर्वांनी हात काढून घेतले आहेत. परंतु, ही आमची संस्कृती नाही, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...
Kirit Somaiya on Sanjay Raut : राऊतांच्या आरोपावर किरीट सोमय्या म्हणाले, हम तो डुबेंगे तो ठाकरे तुम्हे ले डुबेंगे...
सोमय्यांची लोक धिंड काढतील; अमित शाह, फडणवीसांच्या नावानं 400 कोटींची वसूली; राऊतांचा आरोप