एक्स्प्लोर

Chandani Chowk Medha Kulkarni : चांदणी चौक खुला होणार; उद्घाटनापूर्वीच भाजपमध्ये नाराजीनाट्य, कार्यक्रमात डावलल्याचा मेधा कुलकर्णींचा आरोप

  पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे. याच उद्घाटन सोहळ्यात डावलल्याचा आरोप भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.

पुणे :  पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच उद्घाटन होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या पुलावरुन आता नाराजीनाट्य सुरु झालं आहे. या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. याच उद्घाटन सोहळ्यात डावलल्याचा आरोप भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Megha Kulkarni) यांनी केला आहे. कोथरुडमधील सध्याचे नेते माझं अस्तित्व मिटवण्याचं काम करत असल्य़ाचं त्यांनी म्हटलंय. चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं पोस्टर ट्विट करत त्यांनी हा आरोप केला आहे.

मेधा कुलकर्णींनी ट्विटमध्ये काय लिहिलंय?

'माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितिन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला". अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?, असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. 

'माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर'

'मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी' चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.  गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे, असं ट्विट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या-

Pune Chandani Chowk : अखेर मुहूर्त ठरला! चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम पूर्ण; उद्घाटन कधी होणार?

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Meets Eknath Shinde : लंडनमध्ये विराट कोहलीचा मराठमोळा सन्मान; एकनाथ शिंदेंनी शाल-पुष्पगुच्छ देत केला सत्कार, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? पाहा VIDEO
लंडनमध्ये विराट कोहलीचा मराठमोळा सन्मान; एकनाथ शिंदेंनी शाल-पुष्पगुच्छ देत केला सत्कार, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? पाहा VIDEO
मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचं आवाहन, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय, न्यायदेवता ते सरकार नेमकं काय म्हणाले पाटील?
मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचं आवाहन, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय, न्यायदेवता ते सरकार नेमकं काय म्हणाले पाटील?
साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 
साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 
संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांना कार्यालयात घुसून काळं फासलं, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून कारवाईचा इशारा
संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांना कार्यालयात घुसून काळं फासलं, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून कारवाईचा इशारा

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Share Market Crash : शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
Sangli Crime: जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत 20 लाखांची रोकड, 2 तोळे सोनं लुटलं
जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत 20 लाखांची रोकड, 2 तोळे सोनं लुटलं
Rohit Gavit : मोठी बातमी, शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांना कार्यालयात घुसून काळं फासलं, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून कारवाईचा इशारा
संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांना कार्यालयात घुसून काळं फासलं, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून कारवाईचा इशारा
BRICS :  ब्रिक्स सदस्यांसमोर भारतानं ट्रेड प्लॅन मांडला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत मंडपम इथं दाखल, मोदींसोबत चर्चा सुरु
ब्रिक्स सदस्यांसमोर भारतानं ट्रेड प्लॅन मांडला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत मंडपम इथं दाखल, मोदींसोबत चर्चा सुरु
What Is BRICS : ब्रिक्स म्हणजे नेमकं काय? भारत, चीन, रशिया आणि... ट्रम्प यांची धाकधूक वाढवणाऱ्या BRICS मध्ये कोण-कोणते देश आहेत सदस्य? जाणून घ्या सर्वकाही
ब्रिक्स म्हणजे नेमकं काय? भारत, चीन, रशिया आणि... ट्रम्प यांची धाकधूक वाढवणाऱ्या BRICS मध्ये कोण-कोणते देश आहेत सदस्य? जाणून घ्या सर्वकाही
हौथी बंडखोरांनी येमेनमधील अत्यंत मोक्याचं मोखा शहर ताब्यात घेतलं; सागरी मार्गासाठी जगासाठी महत्वपूर्ण असलेल्या बाब अल-मंदेबपासून फक्त 75 किमी अंतरावर बंडखोर पोहोचल्याने चिंता वाढली
हौथी बंडखोरांनी येमेनमधील अत्यंत मोक्याचं मोखा शहर ताब्यात घेतलं; सागरी मार्गासाठी जगासाठी महत्वपूर्ण असलेल्या बाब अल-मंदेबपासून फक्त 75 किमी अंतरावर बंडखोर पोहोचल्याने चिंता वाढली
Embed widget