एक्स्प्लोर

Pune Chandani Chowk : अखेर मुहूर्त ठरला! चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम पूर्ण; उद्घाटन कधी होणार?

पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. अखेर या प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख ठरली आहे. येत्या 12 ऑगस्टला या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.

Pune Chandani Chowk : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. अखेर या प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख ठरली आहे. येत्या 12 ऑगस्टला या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यातुन जाणाऱ्या पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. चांदणी चौकात सतत होणारी वाहतूककोंडी कमी करण्यास या नव्या प्रकल्पामुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. 12 ऑगस्टला होणाऱ्या उद्घाटनची तयारी या ठिकाणी सुरु झाली आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 

उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल 397 कोटी रुपयांचा आहे. मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

चांदणी चौकातील पुलाचं काम सुरु होऊन अनेक महिने झाले आहेत.  चांदणी चोकातील वाहतुकीला अडथळा निर्माम होणारा पुल 1  ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतरही अनेकदा वाहतुक कोंडी जैसे थेच होती. पुणे-बंगळुरु महामार्गावर या पुलामुळे वाहतुक कोंडी प्रचंड प्रमाणात व्हायची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या वाहतुक कोंडीत सापडले होते. त्यानंतर त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिली आणि त्यांनी चांदणी चौकातील पुल पाडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 1  ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतर याच ठिकाणी नवा प्रकल्पाचं काम सुरु होतं. हे काम पूर्ण झाल्याने या प्रकल्पाचं उद्घाटन  12 ऑगस्टला होणार आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

Sindhudurg News: एक झाड लावले तरच मिळेल मॅरेज सर्टिफिकेट, किंजवडे ग्रामपंचायतीचा नवविवाहितांसाठी अनोखा उपक्रम

महत्त्वाच्या बातम्या

जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
मराठवाड्यात कुठे किती चारा शिल्लक? कुठे 175 दिवसांचा, तर कुठे फक्त 76 दिवसांचा साठा! किती पंचनामे पूर्ण? वाचा सविस्तर
मराठवाड्यात कुठे किती चारा शिल्लक? कुठे 175 दिवसांचा, तर कुठे फक्त 76 दिवसांचा साठा! किती पंचनामे पूर्ण? वाचा सविस्तर
पुणे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहाजी बापूंची कोलांटउडी; म्हणाले, मंगेश चिवटेंना समर्थन, मनापासून प्रचार करणार
पुणे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहाजी बापूंची कोलांटउडी; म्हणाले, मंगेश चिवटेंना समर्थन, मनापासून प्रचार करणार

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Embed widget