एक्स्प्लोर

रक्षा खडसेंच्या घरातील 'घड्याळ' चर्चेत; एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, मात्र कमळाच्या घड्याळावर फोटो कायम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील रक्षा खडेसेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीसांची रक्षा खडसेंसोबत बातचित झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, रक्षा खडसे आणि गिरीश महाजन मुक्ताईनगरमधील जिल्हा उपरुग्णालयात पोहोचले.

जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. अशातच आज देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील कोथळी गावात जाऊन रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची भेट घेतली. त्यावेळी ते जळगावातील रुग्णालयाच्या पाहाणीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन हेदेखील होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan)

यांनी ज्यावेळी रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी एक गोष्ट निदर्शनात आली की, काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षा खडसे यांच्या घरातील कमळ आकाराच्या घड्याळ्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोटो आहे. त्यामुळे रक्षा खडसेंच्या घरातील या घड्याळावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील रक्षा खडेसेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीसांची रक्षा खडसेंसोबत बातचित झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, रक्षा खडसे आणि गिरीश महाजन मुक्ताईनगरमधील जिल्हा उपरुग्णालयात पोहोचलेले आहेत. या दौऱ्यादरम्यान, रक्षा खडसेंच्या घरात असलेल्या कमळाच्या आकाराच्या घडाळ्याचीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलं आहे. परंतु, खासदार रक्षा खडसे या अजुनही भाजपमध्येच आहेत. 

पाहा व्हिडीओ : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली रक्षा खडसे यांची भेट, फडणवीसांसोबत गिरीश महाजनांचीही उपस्थिती

खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश 

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत खडसेंनी कमळाची साथ सोडत हातात घड्याळ बांधलं होतं.

एकनाथ खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठं काम केलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलंलं जात होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget