एक्स्प्लोर

सांगलीत भाजप नगरसेविकेची पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मारहाण, व्हीडीओ व्हायरल

भाजप नगरसेविका गीता सुतार यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 'माझ्या प्रभागातील पूरग्रस्त लोकांची तक्रार आल्यानंतर विचारपूस करण्यासाठी आपण त्याठिकाणी गेलो होतो', असे त्यांनी म्हटले आहे.

सांगली : राज्यातील विविध ठिकाणांवरुन सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहे. ही मदत वाढावी यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असं असताना सांगलीमध्ये मात्र पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भाजप नगरसेविका गीता सुतार यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सांगलीतील भाजप नगरसेविका गीता सुतार आणि त्यांचे पती सुयोग सुतार काही कार्यकर्त्यांना घेऊन चादरी आणि चटई मागायला मराठा सेवा संघाच्या कार्यालयात गेले होते. 'तेव्हा तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सरकारकडून घेऊन लोकांना वाटप करा, आम्ही आमच्या पद्धतीने लोकांना वाटप करत आहोत, असं सांगितलं. यानंतर भाजप नगरसेविका गीता सुतार आणि त्यांचा पती सुयोग सुतार यांनी पूरग्रस्त महिलांना मारहाण करत व अन्नधान्यासहित इतर साहित्यांची नासधूस केली. तसेच मदतकार्य करणाऱ्या लोकांना मारहाण केली', असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सांगलीत भाजप नगरसेविकेची पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मारहाण, व्हीडीओ व्हायरल दरम्यान गीता सुतार यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 'माझ्या प्रभागातील पूरग्रस्त लोकांची तक्रार आल्यानंतर विचारपूस करण्यासाठी आपण त्याठिकाणी गेलो होतो. यावेळी राजकीय वर्चस्वासाठी वाद झाला. मी तेथे गेल्यावर माझ्यावर मारहाण झाली', असं गीता सुतार यांनी या घटनेनंतर काढलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे. तसेच आपली कोणत्याही संस्था, राजकीय मंडळीबद्दल तक्रार नसून कोणाची मनं दुखावली असतील तर मी जाहीर माफी मागते असं देखील या पत्रकात म्हटलं आहे. पूर ओसरल्यावर सांगलीतील काय स्थिती आहे?

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
Embed widget