एक्स्प्लोर

पोलिस स्टेशनमध्ये हत्या प्रकरणातील आरोपींचं बर्थडे सेलिब्रेशन

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधील हेमंत उके हत्या प्रकरणातील आरोपींनी आपला वाढदिवस पोलीस स्टेशनमध्ये साजरा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तुमसर पोलिस स्टेशनमध्ये हे बर्थ डे सेलिब्रेशन झाल्याचं वृत्त आहे, मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. तुमसर पोलीस स्टेशनमध्ये हत्येच्या आरोपींनी आपला वाढदिवस साजरा केला. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि पोलिस शिपायांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचं व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती भंडारातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी तुमसर पोलिस स्टेशनला भेट दिली. या गंभीर प्रकरणाची तपासणी करुन कारवाई केली, परंतु तुमसर पोलीस स्टेशनला विचारणा केली असता या प्रकरणाची नोंद नसल्याचं सांगण्यात आलं. तुमसर येथे 30 जानेवारीला भरदिवसा हेमंत उके या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी हत्येचा तपास केला असता प्रशांत गभणे, आशिष गजभिये, संतोष डाहाट आणि सतीश डाहाट यांना संशयावरुन गुन्हा दाखल करत अटक झाली. न्यायालयाने या आरोपींना 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. या आरोपींपैकी प्रशांत गभणे याचा वाढदिवस होता. तो तुमसरचाच रहिवासी असल्यामुळे सेलिब्रेशनसाठी लागणारा केक, मिठाई आणि अन्य गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या समर्थकांनी पोलिसांच्या सहकार्याने पोहोचत्या केल्याचा आरोप आहे. प्रशांत गभने हा तुमसर पोलिस स्टेशनच्या पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे ही पोलिस कोठडी सजवण्यात आली, केक ठेवण्यासाठी स्टूल देण्यात आलं, सर्व तयारी झाल्यानंतर हत्येचा आरोपी प्रशांत गभने याने केक कापला. यावेळी त्याचे सहआरोपी, पोलीस अधिकारी, ड्युटीवर तैनात पोलीस शिपाई उपस्थित होते. त्या सर्वांना आरोपी प्रशांत गभने याने केक भरवला. उपस्थितांनी टाळया वाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोबाईलमध्ये फोटो काढून सोशल साईटवर शेअर करण्यात आले. तुमसर बाजारपेठेत असलेल्या व्यायामशाळेतून हेमंत उके दुचाकीने घरी परत निघाले होते. त्यावेळी मागून आलेल्या एका आरोपीने त्यांच्या डोक्यावर देशी कट्ट्याने दोन गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या वर्षी हेमंत यांचे भाऊ प्रशांत उके यांच्यावर देखील तुमसरमधील एका आरोपीने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर उपचारादरम्यान प्रशांत उके यांचा नागपुरात मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या :

माजी नगरसेवकाप्रमाणे भावाचीही हत्या, पाच जण अटकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जाNashik Baby Kidnapping | नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची चोरी Special ReportSuresh Dhas On Santosh Deshmukh Case| बीडचा बिहार नाही, हमास केला, धस यांचा हल्लाबोल Special ReportLadki Bahin Yojana| लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Embed widget