एक्स्प्लोर

Bird Flu Scare: महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; राज्यात बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू : सुनील केदार

राज्यात आतापर्यंत वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोबड्यांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही.

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबवण्यात येत असून पुढेही सातत्याने राबवण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या 5 राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शिर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. सन 2020-21 मध्ये या संस्थेने आजतागायत राज्यातील एकूण 1715 विष्ठा नमूने, 1913 रक्तजल नमुने 1549 घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमूने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे, असं सुनील केदार यांनी सांगितलं.

पुढे सुनील केदार म्हणाले की, स्थलांतरीत होणाऱ्या जंगलीपक्षांमध्ये, कावळ्यांमध्ये, परसातील कोंबड्यांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन करणाऱ्या ठिकाणावर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे निर्गमीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोबड्यांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुट पालक, अंडी व मांस खाणाऱ्या मांसाहारी नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही.तसेच स्थलांतरीत होणाऱ्या जंगली पक्षांमध्ये, कावळ्यांमध्ये, परसातील कोंबड्यांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणाऱ्या ठिकाणावर असाधारण स्वरुपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा, असं आवाहन केदार यांनी केले.

बर्ड फ्लु रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ राज्यामधील स्थलांतरीत पक्षामध्ये आढळून आला आहे. हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा जिल्ह्यातील पांग धरणाच्या परिसरात सायबेरीया आणि मंगोलीया या देशामधून स्थलांतरीत झालेल्या डोक्यावर दोन पट्या असणाऱ्या बदकांमध्ये मृत्यू आढळून आले आहेत. निशाद (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस. भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने मृत्यूसाठी बर्ड फ्लु रोगाचा H5N1 स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे, हिमाचल प्रदेश राज्यातील वन विभागांद्वारे पानथळ जमीनीशेजारच्या भागामध्ये या रोगाच्या सर्व्हेक्षणाचा मोठया प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget