एक्स्प्लोर

राष्ट्रपती राजवट लागू करणारे कोश्यारी आहेत तरी कोण? संघ अन् भाजपशी काय आहे नातं

सत्तास्थापनेच्या संघर्षात अखेर राज्यपालांनी बाजी मारली. कालपासून(12 नोव्हेंबर)राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळं आता राज्याच्या केंद्रस्थानी राज्यपाल आले आहेत. राष्ट्रपती राजवट लागू करणारे कोश्यारी आहेत तरी कोण? संघ अन् भाजपशी त्यांचा कसा संबंध आला या विषयी घेतलेला धांडोळा.

मुंबई - सत्तास्थापनेच्या तिढ्यात राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सत्तास्थापन करण्यात सर्व पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हा निर्णय घेतला. यानिमित्ताने भगत सिंह कोश्यारी हे राज्याच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आहेत तरी कोण? त्यांचा संघ आणि भाजपमधला प्रवास कसा झाला? याबद्दल जाणून घेऊयात. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर कोणाचे नाव चर्चेत असेल तर, ते म्हणजे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी. युतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु झाल्याने ते एकत्रित सत्तास्थापनेसाठी दावा करु शकले नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला संधी दिली. मात्र, पुरेसे बहुमत नसल्याने ते सत्तास्थापनेचा दावा करु शकले नाही. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण देण्यात आले. सेनेने सत्तास्थापनेचा दावा करत वेळ वाढवून मागितली. राज्यपालांनी त्याला नकार देत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. ते अयशस्वी ठरल्याने अखेर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती शासन सुरु झाल्याने राज्याची सर्व सुत्रे आता राज्यपालांच्या हाती आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कारकिर्दीवर एक नजर -
  • 17 जून 1942 ला उत्तराखंडच्या पालनधुरा गावात भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म
  • इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण 1964 मध्ये अलमोरा विद्यापीठातून पूर्ण
  • याच काळात कॉलेजचे सरचिटणीस म्हणून कोश्यारी निवडून आले होते
  • 1979 ते 1991 या काळात कुमाऊँ विद्यापीठाचे काऊन्सिलवर निवडून गेले
  • लहानपणापासून संघात कार्यरत, आणीबाणीच्या काळात इंदिरांविरोधात आंदोलनं
  • मिसा कायद्याअंतर्गत 1975 ते 1977 अशी दोन वर्ष तुरुंगवासही भोगला
  • 1997 साली भगत सिंह कोश्यारी पहिल्यांदा यूपी विधानसभेवर निवडून आले
  • यूपीच्या विभाजनानंतर 2000 साली उर्जा आणि सिंचन खात्याचे मंत्री झाले
  • 2001 - नित्यानंद स्वामी यांच्या जागी भाजपनं त्यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली
  • 2002 मध्ये उत्तराखंडमध्ये भाजप पराभूत, त्यानंतर 2007 पर्यंत विरोधी पक्षनेते
  • 2008 मध्ये भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले
  • 2014 मध्ये नैनीताल मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले
  • 5 सप्टेंबरला विद्यासागर राव यांच्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल झाले
  • अविवाहित असलेल्या कोश्यारींनी पत्रकार आणि प्राध्यापक म्हणून काम केलं
  • 'पर्वत पियुष' नावाचं साप्ताहिक काढलं आणि चालवलंही
  • 'उत्तरांचल प्रदेश क्यों?' आणि 'उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान' ही दोन पुस्तकं लिहिली
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget