(Source: Poll of Polls)
Deglur Assembly Bypolls Result: भाजपला मोठा धक्का! महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी
Deglur Assembly Bypolls Result: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे देगलूरमध्येही महाविकास आघाडीला पराभूत करून झटका देऊ, असा दावा करणाऱ्या भाजपलाच मोठा झटका बसलाय.
Deglur Assembly Bypolls Result: नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? याबाबत सर्वांनाच उस्तुकता लागली होती. या निवडणुकीचा निकाल समोर आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी 1 लाख 8 हजार 789 यांनी भरघोस मते घेऊन 41 हजार 917 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे देगलूरमध्येही महाविकास आघाडीला पराभूत करून झटका देऊ, असा दावा करणाऱ्या भाजपलाच मोठा झटका बसलाय.
देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत तिसाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी 1 लाख 08 हजार 789 यांनी भरघोस मते घेऊन 41 हजार 917 मतांनी दणदणीत विजय मिळवलाय. यात भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते घेऊन पराभव स्वीकारावा लागलाय. तर, या पोट निवडणुकीत वंचित आपली जादू दाखवू शकली नाहीये, यात वंचित आघाडीचे उमेदवार डॉक्टर उत्तम इंगोले यांना फक्त 11347 मते मिळालीयेत.
देगलूर-बिलोली पोटनिवडणूकित पंढरपूरची पुनरावृत्ती होणार असे बोलले जात होते. परंतु, शिवसेनेतून भाजपात आलेल्या सुभाष साबणे यांच्या प्राचारार्थ महाराष्ट्रातील दिगग्ज विरोधीपक्ष नेते ,केंद्रीय मंत्री यांच्या मोठ मोठ्या जाहीर सभा होऊनही महाविकास आघाडीला जे मताधिक्य मिळालेय त्यावरून मतदारांनी भाजपच्या उमेदवारास मात्र सपशेल नाकारलेय.
एकूणच निवडणूक कालावधीत बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्यावर व निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून धाडी पडल्या. भाजपा दबावतंत्राचा उपयोग करून राजकारण करत असल्याचा जनतेत प्रचार झाला. त्याचा मोठा फटका भाजपला या निवडणुकीत बसलाय. त्यामुळे देगलूर-बिलोली येथील जनतेने काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मताचे दान केलेय.
संबंधित बातम्या-
- Breaking News LIVE Updates : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलं जाणार घरचं जेवण
- Nawab Malik on Sameer Wankhede : शर्ट 70 हजारांचा तर बूट 2 लाखांचे; समीर वानखेडेंच्या लाईफस्टाईलवर नवाब मलिकांचा निशाणा
- Ajit Pawar IT Raid : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तांवर आयकरची कारवाई; कोट्यवधींची मालमत्ता 'अटॅच'