एक्स्प्लोर

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत बिबट्याने धुमाकूळ घातलाय. शेतशिवारातील बिबट्या थेट शहरीभागात आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

बारामती : गेल्या महिन्यापासुन बारामती तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच बारामती नजीक असलेल्या एका कंपनीमध्ये बिबट्या वावरत असणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच काटेवाडी-कन्हेरी जवळील ओढ्यालगत चरणाऱ्या मेंढ्याच्या कळपावरती बिबट्याने हल्ला करुन मेंढीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. बिबट्या बारामती शहरानजीक असल्यामुळे शहरासह तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाव परिसरात धुमाकूळ घातलाय. त्यामुळे प्रशासन आता या बिबट्याला किती तत्परतेने जेरबंद करतंय हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. मागील आठवड्यात बिबट्याने काटेवाडी नजीक असलेल्या एका शेतात कुत्र्याचा फडशा पाडला होता. त्यामुळे आता काटेवाडी व कन्हेरी गावात बिबट्या वावरत असल्याची चर्चा रंगत होती. ही घटना ताजी असतानाच काटेवाडी-कन्हेरी जवळील ओढ्यालगत चरणाऱ्या मेंढ्याच्या कळपावरती बिबट्याने हल्ला केला. शेतकरी महादेव काळे व आनंदा केसकर यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याचा पाठलाग करुन हुसकावून लावून मेंढ्यावरील हल्ला परतावून लावला आणि मेंढ्याचा जीव वाचवला. शेतकऱ्याच्या धाडसाने मेंढीला जीवदान -  काटेवाडी जवळील धनेवस्ती येथील विजय काटे यांच्या शेतात मेंढ्या चरत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने कळपावर हल्ला केला. एका मेंढीला बिबट्याने मानेला जबड्यात धरुन फरपटत नेली. यामुळे इतर मेंढ्या भांबावल्या. हा प्रकार लक्षात आल्याने काळे यांनी धाडसीपणाने बिबट्याचा पाठलाग केला. तोपर्यंत बिबट्याने तीन चार एकर क्षेत्रातुन मेंढी फरपटत नेली. मात्र, काळे यांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवत त्याच्यावर काठीने हल्ला केला. त्यामुळे बिबट्याने मेंढीला सोडत ऊस क्षेत्रामध्ये पळ काढला. काळे यांनी मोठ्या धाडसाने मेंढीचा जीव वाचवला, त्यानंतर याबद्दल वनविभागाला माहिती देण्यात आली. वन विभागानं या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असून इतर उपाययोजनाही केल्या आहेत. मात्र, बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं शेतमालक विजय काटे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच गावात ही घटना घडल्याने प्रशासन किती तत्परता दाखवते , याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. VIDEO | जेव्हा कुत्रा बिबट्याला पळवून लावतो... | धुळे | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget