(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi Accident: भिवंडीत दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
एकाच दिवसांत दोन अपघात (Accident) झाले असून या दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
भिवंडी : भिवंडीत (Bhiwandi ) मध्यरात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.यामध्ये महापालिकेतील सफाई कामगार सागर परमार (32 वर्षे) आणि आणखी एक तरुण फिरदोस असरार खान (30 वर्षे) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या दोन्ही घटनेत गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. एकाच दिवसांत दोन अपघात (Accident) झाले असून या दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
पहिल्या घटनेत मनपा सफाई कामगार सागर परमार आपल्या मित्रासह कल्याण परिसरातून भिवंडीकडे येत असताना अचानक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. धडक दिल्यानंतर सागर रस्त्यावर कोसळला ज्यामध्ये सागरच्या डोक्याला जबर मार बसला व ते रक्तबंबाळ झाला . स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ढाब्यावर जेवण करून घरी परतताना महिलेचा अपघाती मृत्यू
तर दुसऱ्या घटनेत भिवंडी नाशिक मार्गावरील चावींद्रा परिसरातून कुटुंबासह ढाब्यावर जेवण करून आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना अपघात झाला. रस्त्याच्याकडेला उभ्या केलेल्या वाहनामुळे हा अपघात झाला आहे. मागून येणाऱ्या ट्रकचा कट लागल्याने दुचाकी स्वाराचा तोल गेला रस्त्यावर दुचाकीस्वार आणि मागे बसलेली पत्नी पडली. ट्रकच्या चाक महिलेचा अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या घटनेत महिलेचा पती आणि दोन मुले रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेल्याने जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
ट्रक चालकास पकडून नागरिकांनी बेदम चोप दिला तसेच वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली . त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी करता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी या दोन्ही घटनेत गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.महामार्गावरच वसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या ठिकाणी वाहन चालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय.
पालघरमध्ये अपघातांची मालिका
पालघर (Palghar) जिल्ह्यामध्ये शुक्रवार 22 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाले. एकाच दिवसांत चार अपघात (Accident) झाले असून या चार अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. दिवसभरात झालेल्या तीन अपघातानंतर संध्याकाळाच्या सुमारास वाडा मार्गावर कुडूस येथे एका ट्रकने 54 वर्षीय महिलेला चिरडंल. या अपघातामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला. देवी उपेंद्र शर्मा असं या 54 वर्षीय मृत महिलेच नाव आहे. या अपघातानंतर ट्रच चालक ट्रक घटनास्थळी सोडून फरार झालाय.