एक्स्प्लोर
भिरा पुन्हा तापलं, तापमान 45.5 अंशावर!

रायगड: रायगड जिल्ह्यातील भिरा काल पुन्हा एकदा तापलं. भिरात काल राज्यातील सर्वाधिक 45.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. यापूर्वी 28 मार्चला भिरा इथं जगातील दुसऱ्या क्रमाकांच्या तापमानाची म्हणजेच 46.5 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. भारतीय हवामान विभागानं यासंदर्भात माहिती दिली. भीरानंतर चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चंद्रपुरातही 42.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबईचा पाराही 40च्या पार गेला आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा उन्हाच्या झळा वाढल्याचं चित्र आहे. पण, ही उष्णतेची लाट नसल्याचं भारतीय हवामान विभागाचं स्पष्ट केलं. दुसरीकडे उद्या दुपारपर्यंत उन्हाचा पारा चढाच राहणार असल्याचं भाकीतही हवामान विभागाने केलं आहे. सर्वाधिक तापमानाचे जिल्हे
- भिरा (रायगड) - 46.5 अंश
- चंद्रपूर - 42.2
- अकोला - 41.4
- अहमदनगर - 41.2
- वर्धा - 40.2
आणखी वाचा























