एक्स्प्लोर
Advertisement
कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला तेव्हा भिडे गुरुजी तिथे नव्हतेच, उदयनराजे भोसलेंचा दावा
कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी अनेकांनी भिडे गुरुजींवर आरोप केले आहेत. परंतु त्या दिवशी भिडे गुरुजी कोरेगाव-भीमा येथे नव्हते, असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी अनेकांनी भिडे गुरुजींवर आरोप केले आहेत. परंतु त्या दिवशी भिडे गुरुजी कोरेगाव-भीमा येथे नव्हते, असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. आज (शनिवार, 07 एप्रिल) उदयनराजे एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.
उदयनराजे म्हणाले की, त्यांच्याबद्दल (भिडे गुरुजी)कोण काय म्हणतं, हे मला माहीत नाही, पण मला इतकं माहीत आहे, कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार झाला तेव्हा, भिडे गुरुजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतल्या घरी होते. पाटील यांच्या घरात एक दुःखद घटना घडली होती. भिडे गुरुजी त्याच ठिकाणी होते. ते काय देव नाहीत, एकाच वेळी दोन ठिकाणी हजर असायला.
भिडे गुरुजींबद्दल उदयनराजे म्हणाले की, गुरुजी वडिधारे आहेत. आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे की गुरुजींसारख्या लोकांचा आपल्याला सहवास लाभला आहे. गुरुजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप कामं केली आहेत. त्यांनी राबवलेल्या गडकोट मोहिमा कौतुकास्पद आहेत.
पाहा काय म्हणाले उदयनराजे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement