एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav : भुजबळांवर तुटून पडले, मराठा आरक्षणासाठी एकहाती लढले; भास्कर जाधवांचे विधानसभेतील घणाघाती भाषण

Bhaskar Jadhav Reaction Chhagan Bhujbal : आरक्षणप्रश्नी एकांगी भाषण फक्त आणि फक्त छगन भुजबळांनी केलं, बाकी कुणीही नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला. 

मुंबई: आरक्षणप्रश्नी ज्या लोकांनी भाषण केलं त्यामध्ये फक्त छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) एकांगी भाषण केलं, बाकी कुणी केलं नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला. तुम्ही राज्याचे वरिष्ठ मंत्री आहात, आयुष्यभर सत्तेत आहात, तुम्हाला राज्यात काय घडवायचं आहे? असा सवालही त्यांनी केला. मराठा समाजाची आजची अवस्था ही सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी झाली आहे, त्यामुळे मराठ्यांना आरक्षणाची गरज असल्याचं ते म्हणाले.  

मराठ्यांना उत्पन्नाचे साधन काय?

मराठ्यांवर संरक्षणाची जबाबादारी होती. इंग्रज आले आणि त्यांनी डोकं चालवलं. मराठे आपल्याला कापायला कमी करणार नाहीत म्हणून लढाई केली आणि त्यामधून तरुण मुलांना कापण्यात आलं. त्यानंतर सिलिंग अॅक्ट आला, कुळ कायदा लागू झाला. कोकणात जमीन कोणाला जास्त नाही. मग मराठ्यांना उत्पादनाचं साधन काय आहे? आम्ही रयतेचे राजे, जहागीरदार म्हणुन मिरवत राहिलो, मात्र पुढचं भविष्य अंधकारमय करुन ठेवलं. मराठा समाजाचा परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. 

भुजबळांचे भाषण एकांगी (Chhagan Bhujbal Speech On Maratha Reservation) 

आज भुजबळ बोलत आहेत, मात्र त्यांची आणि फडणवीस यांची काय जुगलबंदी झाली त्याचा प्रत्येक शब्द मी आणला आहे. संशयाची सुई कोण फिरवत आहे. एकांगी भाषण हे फक्त भुजबळ यांचं झालं. नाव घेऊन सांगतो. आयुष्यभर तुम्ही सरकारमध्ये आहात, वरिष्ठ मंत्री आहात. काय घडवायचं काय आहे या महाराष्ट्रात? राज्यात नऊ जातीय दंगली झाल्या. शाहू महाराज यांच्या कोल्हापुरमध्ये दंगली झाल्या.   

जालन्यात लाठीचार्जचा आदेश कुणी दिला हे सर्वांना समजू द्या

मनोज जरांगे यांच्या आदोलनामध्ये महिला या भजन गात होत्या, पण त्यांच्यावर लाठीचार्जचा आदेश देण्यात आला. तो आदेश कुणी दिला याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. आतापर्यंत मराठा समाजाचे 58 मोर्चे शांततेत झाले. हे मोर्चे लाखोंचे होते आणि कुठेही काहीही हिंसा न घडता ते पार पडले. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली. पण आताच का म्हणता की मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली? त्या आंदोलनाबद्दल चुकीची माहिती पसरवली जाते. 

ही बातमी वाचा :

VIDEO Bhaskar Jadhav Speech: Chhagan Bhujbal यांच्यावर तुटून पडले, मराठा आरक्षणावर घणाघाती भाषण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget