उद्धव ठाकरेंना अश्रू अनावर, रवी म्हात्रे ढसाढसा रडले; मातोश्रीवरील बैठकीत काय झाले?
Maharashtra Politics Uddhav Thackeray: मातोश्रीवर दुपारी झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना भावूक होताना पहिल्यांदाच पाहिलं
Maharashtra Politics Uddhav Thackeray: मातोश्रीवर दुपारी झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना भावूक होताना पहिल्यांदाच पाहिलं, असे आमदार भास्कर जाधव म्हणाले. ते ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी चिन्ह आणि पक्षाच्या नावावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली होती. यावेळी आमदार आणि खासदारांच्या या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं. रवी म्हात्रे म्हणाले धनुष्य बाण आम्ही बाळासाहेब यांच्यासोबत देवाऱ्यात ठेवले होते, आज तेच चिन्ह त्यांनी गोठवले होते असेही भास्कर जाधव म्हणाले.
ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेमध्ये भास्कर जाधव यांनी चौफेर टीका केली. ते म्हणाले, 'एकनाथराव ही शिंदे शाही नाही तर इतिहासात तुमचे नाव मुघलशाही म्हणून प्रसिद्ध होईल. कारण मुघलांनी आपल्या वडिलांचा खून केला आणि गादीवर बसला, हिंदूंमध्ये असा एकही राजा नाही. ' हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे 6 वर्ष साठी मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला. त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते, असेही भास्कर जाधव म्हणाले. त्यांना माहीत आहे जर देवेंद्र फडणवीस यांचा जप केला नाही तर ते एकदा माईक खेचला आता खुर्ची खेचातील, असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगवला.
एकनाथ शिंदे यांनी सम्राट पथ्वीराज हा सिनेमा बघावा. एकनाथ शिंदे त्या जयचंद राठोडप्रमाणे एक ना एक दिवस तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. हा डाव भाजपाच आहे, ही सर्व त्यांची प्यादी आहेत, असे भास्कर जाधव म्हणाले. निवडणुका नसताना अशी गर्दी झालेली आम्ही पहिल्यांदा बघतोय. आपल्याला शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावावा लागेल. बीकेसीवर देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट होती, असेही भास्कर जाधव म्हणाले.
शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा आजपासून सुरू झाली आहे. याची सुरूवात आज ठाण्यातील टेंभी नाका येथून झाली. टेंभी नाका येथील महाप्रबोधन यात्रेत शिवसेचे नेते भास्कर जाधव, विनायक राऊत आणि सुषमा अंधारे यांनी सभेला संबोधीत केले.
महत्वाच्या बातम्या