एक्स्प्लोर

भारत बायोटेकच्या बहुप्रतीक्षित 'कोवॅक्सीन' लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु

पहिल्या टप्प्याच्या चाचणीत 18 ते 55 वयोगटातील स्वयंसेवकांना लस लावली गेली होती. त्यांच्या वरील परिणाम उत्साहवर्धक असल्याने आता 12 ते 65 वयोगटातील स्वयंसेवकांना चाचणीसाठी निवडले गेले आहे.

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या बहुप्रतीक्षित कोवॅक्सीन या कोरोना वरील लसीची दुसऱ्या टप्याची चाचणी सुरु झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशभरात 12 ऐवजी 8 केंद्रांवर ही चाचणी घेण्यात येत असून नागपूर त्यापैकी एक आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपुरात 50 जणांना ही लस लावण्यात आली असून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात नागपुरात 55 जणांवर लसीची चाचणी करण्यात आली होती. दोन वेळा लस लावल्या गेल्यानंतर निगराणीच्या कालावधीत त्या सर्वांची तब्येत ठणठणीत असल्याने आता दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे.

नागपुरात ज्या गिल्लूरकर मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सीनची चाचणी सुरु आहे, त्याचे संचालक डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात काही बदल करण्यात आले असून सर्वात महत्वाचा बदल चाचणीसाठी कमी आणि जास्त वयाचे स्वयंसेवक ही निवडण्यात आले आहे. पहिल्या टप्प्याच्या चाचणीत 18 ते 55 वयोगटातील स्वयंसेवकांना लस लावली गेली होती. त्यांच्या वरील परिणाम उत्साहवर्धक असल्याने आता 12 ते 65 वयोगटातील स्वयंसेवकांना चाचणीसाठी निवडले गेले आहे. त्यामुळे किशोरवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकनांना लस दिल्यास त्याचे परिणाम काय होणार हे या टप्प्यात तपासले जाणार आहे.

पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात होणारा आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे लसीच्या दोन डोसेज मधला अंतर वाढवला गेला आहे. पहिल्या टप्प्यात दोन डोसेज मध्ये 14 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात दोन डोसेजमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवले जाणार आहे. ( प्रत्येक टप्प्यात प्रत्येक स्वयंसेवकाला दोन वेळेला लसीचे डोज दिले जातात )

दरम्यान, पहिल्या टप्प्यात देशभर ज्या 375 स्वयंसेवकांना ही लस लावण्यात आली होती. त्या सर्वांची प्रकृती चांगली असून त्यापैकी एकाही ही स्वयंसेवकाला कुठलाही त्रास झालेला नाही. त्यामुळे कोवॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेबद्दल आता कोणतीही साशंकता राहिली नसल्याचे तज्ज्ञांना वाटतंय. पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांना लसीचे दोन डोज लावल्यानंतर त्यांच्या शरीरात कोरोना विषाणू संदर्भात अँटीबॉडीज तयार झाले की नाही याची तपासणीही भारत बायोटेकने केली आहे. मात्र, त्याचा डेटा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआय आणि सरकार सोबत शेअर केला जात असून त्यांच्या माध्यमातूनच लवकरच संपूर्ण देशाचा डेटा जाहीर केला जाईल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, लसीचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा टप्पा ही सुरु झाला आहे. त्यामुळे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआय लवकरच लसीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारताचा कोरोना विरोधातला लढा निर्णायक टप्प्यात पोहोचेल.

Lockdown Effect on kids | कोरोना, लॉकडाऊनचा लहानग्यांवर परिणाम? मुलांमध्ये चिडचिड, अतिसंताप, भुकेच्या तक्रारी!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटला, तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना मार्ग निघाला, इनसाईड स्टोरी
महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटला, तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना मार्ग निघाला, इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Mahendra Singh Dhoni: धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
Ladki Bahin Yojana : सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधतंय, लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरताच रोहिणी खडसेंचा संताप
सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधतंय,80 लाख महिला अपात्र ठरताच रोहिणी खडसेंचा संताप
Embed widget