Bhandara: भंडाऱ्यात डोळ्याच्या साथीचा शिरकाव, लहान मुलांसह वृद्धांनाही होतोय त्रास; काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
वातावरणात सतत बदल (Climate Change) होत आहे. त्यामुळं भंडारा (Bhandara) शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या संसर्गानं त्रस्त केलं आहे.
Bhandara News : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल (Climate Change) होत आहे. त्यामुळं भंडारा (Bhandara) शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या संसर्गानं त्रस्त केलं आहे. यात लहान बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं ओपीडीत वाढ होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज 40 पेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय असो की जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय असो, तिथं डोळ्यांच्या आजारासाठी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या वाढल्याचं चित्र बघायला मिळत आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दोन दिवसात डोळ्यांच्या संसर्गामुळं त्रस्त असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात पोहोचले आहेत. दररोज 40 पेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. अनेकांना डोळे लाल होणे आणि डोळ्यांना सूज येणे असा त्रास होत आहे. डोळ्यांच्या खासगी रुग्णालयातील आणि शासकीय रुग्णालयातील नेत्र तज्ञांकडील रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी, रुग्णालय प्रशासनाचं आवाहन
डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यानं कुटुंबातील अनेकांना त्रास होत आहे. वातावरणातील बदलामुळं डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. त्यामुळं नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन रुग्णालय प्रशासनानं केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Health Tips : तुमचे डोळे वारंवार लाल होतात? ही सामान्य समस्या नाही तर आहे गंभीर आजार; वेळीच सावध व्हा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )