Bhandara News : मोठी बातमी : भंडाऱ्यात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, 14 कामगार इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची भीती
Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
भंडारा : जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट (Bhandara Blast) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याची माहिती समोर आली होती. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र या दुर्घटनेत पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'एक्स'वर दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहराच्या नजिक जवाहरनगर नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी एक आयुध निर्माण कंपनी आहे. या कंपनीच्या आर. के. सेक्शनमध्ये सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान मोठा स्फोट झाला.इमारतीत स्फोट झाला तेव्हा तिथे 14 कामगार कार्यरत होते. स्फोट झाल्यानंतर इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीच्या मलब्याखाली 13 ते 14 कामगार दबल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर पोस्ट करत महत्वाची माहिती दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत. आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 24, 2025
आणखी वाचा
मोठी बातमी : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू