एक्स्प्लोर
प्रेयसी लग्नाआधी प्रेग्नंट, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
सोपान बोरकर याचे शेतात कामावर येणाऱ्या गावातीलच एका 23 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. पीडित तरुणीला सोपानने लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

प्रातिनिधीक फोटो
भंडारा : प्रेमसंबंधातून प्रेयसीला गर्भधारणा झाल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीने प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. सोपान बोरकर याचे शेतात कामावर येणाऱ्या गावातीलच एका 23 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. पीडित तरुणीला सोपानने लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातूनच प्रेयसीला गर्भधारणा झाली. सहावा महिना सुरु झाल्यानंतर तिने सोपानकडे लग्नाची मागणी केली, मात्र सोपान तिला उडवाउडवीची उत्तरं देत होता. ही बाब गावात पसरल्यामुळे बदनामीच्या भीतीने सोपानने शेतातील झोपडीत कीटक नाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती खालवल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. पीडित युवतीने लाखनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी सोपान बोरकर विरुद्ध बलात्कारचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास करत आहे.
आणखी वाचा























