एक्स्प्लोर
प्रियकराच्या संगनमताने सहा मित्रांचा तरुणीवर गँगरेप
भंडारा : प्रियकराच्या संगनमताने त्याच्या सहा मित्रांनीच अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची मती सुन्न करणारी घटना भंडाऱ्यात समोर आली आहे. नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन तरुणीवर गँगरेप झाल्याची घटना ताजी असतानाच समोर आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
भंडारा जिल्ह्यातल्या दाभा गावात तरुणाने सहा मित्रांकडूनच त्याच्या प्रेयसीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर आणखी एका आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे.
घरी आईशी भांडण झाल्यानंतर पीडित अल्पवयीन तरुणी प्रियकर राकेश भिगवडे याच्यासोबत पांढराबोडी परिसरात गेली होती. तिथे राकेशने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर राकेशने त्याच्या मित्रांकडून तरुणीवर सामूहिक अत्याचार केले.
13 ते 16 एप्रिल या कालावधीत आरोपी पीडितेवर पांढराबोडी परिसरातील जंगलात सामूहिक अत्याचार करत होते. 17 तारखेला ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला दाभा गावानजीकच्या शेत शिवारात सोडून आरोपी पसार झाले.
संबंधित बातम्या
नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
नागपूरच्या आमदार निवासातील गँगरेपबाबत धक्कादायक माहिती
नागपूर आमदार निवासाचे नियम कडक, ‘माझा’च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
आमदार निवासातील बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement