एक्स्प्लोर

भंडाऱ्यात भरधाव पिकअप वाहनांनं तिघांना दिली धडक, वाहनचालक वाहन सोडून फरार, पोलिसांकडून शोध सुरु   

भंडाऱ्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

Bhandara Accident News :  भंडाऱ्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. गजबजलेल्या जे एम पटेल कॉलेज रोडवर ही घटना घडली आहे. एका भरधाव पिकअप वाहनांनं तिघांना जबर धडक दिली आहे. यामध्ये तिघांनाही दुखापत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

भंडारा शहरातील अत्यंत गजबजलेला मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जे एम पटेल कॉलेज रोडवर रात्री नऊ वाजताच्या सुमारास एका भरधाव पिकअप वाहनांनं तिघांना जबर धडक दिली. या तिघांमध्ये भंडारा पोलिसात कार्यरत पोलीस कर्मचारी विजय तायडे यांची आई नंदा तायडे यांचा समावेश आहे. जे एम पटेल कॉलेज मार्गावर सुरुवातीला दोघांना धडक दिल्यानंतर कारवाईच्या धास्तीनं वाहनासह चालक तिथून पळाला. यानंतर याचं पिकअप वाहनानं जे एम पटेल कॉलेजच्या मागील भागात असलेल्या शासकीय मुलींच्या वसतीगृहाजवळ पोलीस कर्मचाऱ्यांच्या आईला जबर धडक दिली. या अपघातानंतर चालकांनं वाहन अंधारात सोडून तिथून पळाला आहे. या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश असून ते सुदैवानं बचावलेत. भंडारा पोलीस पुढील तपास करीत आहे.

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, एकाच मृत्यू

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway)  भीषण (Accident)  अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गावात हा भीषण अपघात झाला आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली आहे. यामध्ये एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान,  कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली आहे. धडक बसलेल्या वाहनांमध्ये आरटीओ विभागाची गाडी देखील आहे. महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सतत घडणाऱ्या अपघातामुळे हातखंबा ग्रामस्थ भितीच्या छायेत आहेत. 

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत कारचा मोठा अपघात

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरात पिकनिक पॉईंटजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. दारुच्या नशेत कार चालवत असल्यामुळं कारने बाईकला जोरदार धडक दिली आहे. यावेळी कार चालकाने कारमध्ये बोगस महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावून बाईक चालकाला दमदाटी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, काळी-पिवळीची पलटी; दुचाकीचा चेंदामेदा, 8 जखमी

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget