Majha Katta : आदिशंकराचाऱ्यांच्या शिल्पाचे काम झाले, कामाची पोचपावती मिळाली, आता एक ड्रीम प्रोजेक्ट उरलाय: भगवान रामपुरे
Bhagwan Rampure On Majha Katta : मूर्तीमध्ये ईश्वर नसतो, तो त्याच्या भावामध्ये असतो, तुम्ही ज्या भावनेने पाहाल त्या भावनेने तुम्हाला परत मिळणार असतं असं शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सांगितलं.
Bhagwan Rampure On Majha Katta : आदिशंकराचाऱ्यांच्या शिल्पाचे काम झाल्यावर मुंबईच्या एका मित्राचा फोन आला, तो म्हणाला की जसा लता मंगेशकरांचा अलौकिक गळा आहे, तसा तुमचा हात आहे, त्यामुळे तुमच्या हाताचा इन्शुरन्स काढून घ्या असं त्यांने सांगितलं. हीच आपल्या कामाची पोचपावती होती असं भगवान रामपुरे यांनी सांगितलं. भगवान रामपुरे (Majha Katta) यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा शिल्पप्रवास उलगडला.
मूर्तीमध्ये कोणताही ईश्वर नसतो, त्याच्या भावामध्ये तो असतो, तुम्ही ज्या भावनेने पाहाल त्या भावनेने तुम्हाला परत मिळणार असतं, त्यामुळे मूर्तीचा भाव जाणणं महत्त्वाचं असतं असं प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुर यांनी सांगितलं.
गुलजारांच्या पोट्रेटची कथा
गणपतीच्या पोर्ट्रेटने आपल्याला प्रसिद्धी मिळवून दिली असल्याचं सांगत भगवान रामपुरे म्हणाले की, गणपतीचे शिल्प एका मित्राने पाहिलं, त्याला दिलेलं गिफ्ट हे त्यांनी विजय तेंडुलकरांना दिलं. त्यानंतर तेंडुलकरांनी त्याची स्तुती केली. त्यांनी मला भेटायला बोलावले. त्यांना भेटल्यावर त्यांनी माझ्या कलेचं विश्लेषण केलं, कौतुक केलं. त्यावेळी त्यांचे पोर्ट्रेट करतो असं मी सांगितलं. त्यानंतर एका मित्रासोबत गुलजारांना भेटायला गेलो. त्यावेळी माझा अल्बम त्यांनी पाहिला. मी त्यांचे पोर्ट्रेट करायची इच्छा व्यक्त केली आणि त्यावेळी त्यांनी मला वेळ दिला. त्यावेळी मी त्यांचे कॅरेक्टर पकडलं आणि त्यांचे पोर्ट्रेट केलं.
शिल्प साकारताना डोळे कसे साकारता?
प्रत्येक शिल्प साकारताना त्यामध्ये जीवंतपणा असणं महत्त्वाचं असतं. तो जिवंतपणा साकरण्यासाठी त्या शिल्पातले डोळे साकारणं महत्त्वाचं असल्याचं भगवान रामपुरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, एखादे शिल्प साकारताना झोकून देऊन काम केलं तर ते शिल्पच आपल्याला मदत करते. एक स्टेज अशी येते की ते शिल्पच सांगतंय आपल्याला काय करायचं. त्यामध्ये डोळे हेच महत्त्वाचे असतात. ते जेवढे बोलते तेवढं कोणताही भाग संवाद साधत नाही. पूर्ण झोकून देऊन काम केल्यास त्या शिल्पाचे डोळे साकारले जातात, त्यामध्ये जिवंतपणा येतो.
मीराच्या मनातला श्रीकृष्ण साकारला
कलावंत म्हणून काम करताना अनेकदा अशी उर्जा प्राप्त झाली की झपाटून काम केलं असं सांगताना भगवान रामपुरे म्हणाले की, मीराचे शिल्प मी साकारत होतो. एक प्रसंग समोर आला. मीरा भजन करताना तिला देहाचंही भान राहिलं नाही, ती भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन झाली. मग श्रीकृष्णाचं शिल्प साकारताना गणपतीचे निराकार शिल्प समोर आलं. त्या गणपतीचे शिल्प जसं होतं तसंच केलं. श्रीकृष्ण साधा उभा केला. पण तीन चार वर्षानंतर अचानक पहाटे वही पेन घेतलं आणि निराकार गणेश आणि श्रीकृष्णाचे चित्र काढलं.
ड्रीम प्रोजेक्ट काय आहे?
आतापर्यंत इतके जगप्रसिद्ध पोट्रेट तयार केले, त्याचं मोठं कौतुक झालं, मग आपल्या आयुष्याती ड्रीम प्रोजेक्ट काय आहे असं विचारल्यावर भगवान रामपुरे म्हणाले की, प्रत्येकाला वाटतंय असं काही लक्षात राहण्यासारखं काम करावं. माझ्या मनातही अनेक शिल्पे अनेक वर्षांपासून आहेत, पण ती सत्यात उतरली नाहीत. एक शिल्प गेल्या 25 वर्षांपासून माझ्या मनात आहे. ते सत्यात उतरवणं हे ड्रीम आहे. विजय आनंद यांचे शिल्प साकारायचं होतं पण ते होऊ शकलं नाही. त्या आधी मला गुरूदास यांचे शिल्प साकारायचं होतं, पण तेही होऊ शकलं नाही.
ही बातमी वाचा:
- Majha Katta : बिग बुलचे शिल्प उभारले आणि मार्केट पडलं, लोक त्याला पणवती म्हणू लागले; वाचा बाँम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बिग बुलच्या शिल्पाची कथा
- Majha Katta : कलावंत म्हणून काम करताना अनेकदा अशी उर्जा प्राप्त झाली की झपाटून काम केलं; प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सांगितला शिल्पप्रवास