अपघातवार! बेळगावात बस-कार अपघातात चौघे मृत तर पंढरपुरात कॅनॉलमध्ये टेम्पो पडून बापलेकीचा मृत्यू
बेळगावातील मुरगोडजवळ एक कार आणि बसमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पंढरपूरजवळील माळेगाव मिटकलवाडीत कॅनॉलमध्ये छोटाहत्ती टेम्पो पडून पित्यासह मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
पंढरपूर/बेळगाव : दोन भीषण अपघातांनी आजचा रविवार हा अपघातवार ठरला आहे. बेळगावातील मुरगोडजवळ एक कार आणि बसमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पंढरपूरजवळील माळेगाव मिटकलवाडीत कॅनॉलमध्ये छोटाहत्ती टेम्पो पडून पित्यासह मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
बस आणि कारच्या अपघातात चार जण मृत बस आणि कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू बेळगावातील चचडी क्रॉस येथे झाला आहे. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून क्रेनने कार बाहेर काढली गेली. यात कारमधील चौघांचा मृत्यू झाला. मृतकांची नावं अद्याप कळलेली नाहीत. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील चचडी क्रॉस येथे हा अपघात झाला. वास्कोहून बस इलकलला निघाली होती तर कार यरगट्टीहून बेळगावला येत होती. मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. अपघातामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
गुरांचे मकवान घेऊन जाणारा छोटा हत्ती कॅनॉलमध्ये पडला, बापलेकीचा अंत गुरांचे मकवान घेऊन जाणारा छोटा हत्ती टेम्पो कॅनॉल पट्टीमध्ये पडून चालक पित्यासह मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माळेगाव मिटकलवाडी कॅनोलमध्ये घडली. तात्यासाहेब बाळासाहेब कोळी-माने(चालक) व आरती तात्यासाहेब कोळी-माने या सहा वर्षाच्या मुलगी या दोघांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. तात्यासाहेब कोळी हे त्याचा छोटा हत्ती एम एच 45 टी 0312 मध्ये मकवान भरून सोबत त्याची मुलगी आरती हिला घेऊन मालेगाव मिटकलवाडी कॅनॉल पट्टीने जात असताना रोडच्या डाव्या साईडला असलेल्या कॅनॉल पट्टीमध्ये पडून या दोघांना जीव गमवावा लागला.
नवीन घराच्या बांधकामाला पाणी मारताना शॉक लागून युवकाचा मृत्यू नवीन घराच्या बांधकामाला पाणी मारताना शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील हरपळवाडी येथे घडली. 29 वर्षीय सचिन काळभोर असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेने हरपळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.