अंत्यविधीला पैसे नसल्याने आईवर तीन दिवसांनी अंत्यसंस्कार!
लॉकडाऊनमुळे उद्योग ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या. त्यातच पैसे नसल्याने तीन दिवसांनी आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ ओढवल्याची घटना बेळगावात घडली आहे

बेळगाव : कोरोनाव्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय-उद्योग ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. लॉकडाऊनमुळे ओढावलेली परिस्थिती किती भीषण आहे याचा प्रत्यय बेळगावात आला. पैसे नसल्याने तीन दिवसांनी आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ ओढवल्याची घटना घडली आहे. अखेर एका संस्थेच्या मदतीने तीन दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारती चंद्रकांत बस्तवाडकर यांचे जिल्हा रुग्णालयात 16 ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांची दोन मुलं हॉटेलमध्ये काम करत होती. पण लॉकडाऊनमुळे त्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळे ते सध्या मिळेल ते काम करुन गुजराण करत आहेत. अशा स्थितीत त्यांच्या आईला अपघात झाला आणि ती जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिचं 16 तारखेला निधन झालं.
निधनाचं वृत्त दोन्ही मुलांना समजले पण त्यांच्याकडे आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील शवागरात मृतदेह तसाच पडून राहिला. ही माहिती हेल्प फॉर निडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना समजताच त्यांनी मृत महिलेची मुलं सुरज आणि युवराज यांच्याशी संपर्क साधला. पुढाकार घेऊन सुरेंद्र अनगोळकर यांनी शववाहिकेतून मृतदेह स्मशानात नेला. तिथे अंत्यसंस्कार करण्याची सगळी व्यवस्था केली. त्यानंतर भारती यांच्या मुलाने आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले.
Yavatmal Masanjogi | स्मशानभूमीत 'मरणाच्या वाटेवरच जगणं'; लॉकडाऊनमुळे मसणजोगी समाजावर उपासमारीची वेळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
