एक्स्प्लोर
बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला 5 लाखांची लाच घेताना अटक
कांबळे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक महादेव महाकुंडे यांनाही अटक करण्यात आली. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बीड : बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कांबळे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक महादेव महाकुंडे यांनाही अटक करण्यात आली. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी पाच लाखांची मागणी केली होती. एका गोदाम रक्षकावर झालेल्या आरोपांची चौकशी कांबळे यांच्याकडे होती. या चौकशीत मूळ अभिलेख तपासला जाणार होता. त्या गोदाम रक्षकाला क्लिनचीट देण्यासाठी कांबळे यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
कांबळे यांनी मागणी केल्याची खातरजमा 31 तारखेला लाचलुचपत विभागाने केली होती. त्यानंतर आज सकाळी कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानी लाचलुचपत विभागाने सापळा रचून पाच लाख रुपये स्वीकारताना कांबळे आणि लिपीक महादेव महाकुंडेला रंगेहात पकडले.
बीडमध्ये लाच घेताना अटक केल्यानंतर कांबळे यांच्या बीडसह औरंगाबाद, नांदेड, तळेगाव येथील घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
